जर तुम्हाला एखादा व्यवसाय स्थापन करायची इच्छा आहे परंतु तुमच्याजवळ भांडवल नाही. तर तुम्ही अगदी कमी पैशांच्या सहाय्याने बिझनेस सुरु करू शकतात आणि त्या माध्यमातून चांगली कमाई सुद्धा होऊ शकते.
आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत. ही आयडिया सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला फक्त दहा हजार रुपयांची गरज भासणार आहे.
तुम्ही दहा हजार रुपयाच्या कमीत कमी भांडवलावर आईस्क्रीम पार्लर हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायामध्ये तुम्हाला कधीही तोटा होऊ शकत नाही कारण पूर्ण देशात आईस्क्रीम खाणाऱ्यांची संख्या कमी नाही.आपल्याला माहिती आहेच की आईस्क्रीम याबाबतीत लोकांमध्ये भरपूर प्रमाणात क्रेझ आहे.
तुमचा पैसा कधीही वाया जाणार नाही
उन्हाळ्याचा ऋतू असो या हिवाळा तरीसुद्धा आईस्क्रीम खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोणत्याही प्रकारचे रेस्टॉरंट असो या मोठी हॉटेल तसेच कुठल्याही लग्नाच्या कार्यक्रमात जरी आपण गेलो तरी आपण आईस्क्रीम खाणे विसरत नाही.
निरंतर मागणी असल्यामुळे आइस्क्रीम पार्लर मध्ये गुंतवणूक केलेल्या पैसा वाया जाणार नाही याची शाश्वती असते. आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यासाठी तुमच्याजवळ फक्त एका फ्रिजची आवश्यकता असते.जर तुमचा हा व्यवसायचांगल्या प्रकारे चालायला लागला तर आमची प्रगती फार जलदहोऊ शकते. मागील काही वर्षाचा विचार केला तर आइस्क्रीम पार्लर हा व्यवसाय खूप जलदपने वाढला आहे.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागते FSSAI चा परवाना
आईस्क्रीम पार्लर उघडण्यासाठी तुम्हाला FSSAI चे लायसन्स घेणे गरजेचे असते. FSSAI कडून तुम्हाला पंधरा अंकांचा एका रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. हे लायसन्स मिळाल्यानंतर ग्राहकांमध्ये खात्री असते की तेथील आईस्क्रीम हीFSSAIस्टॅंडर्ड मानकांना पूर्ण करते.FSSAI च्यानुसार, सन 2022 पर्यंत भारतात आईस्क्रीमचा व्यवसाय हा एक अरब डॉलर म्हणजेच सातारा 7422 कोटी रुपये पेक्षा जास्त होऊ शकतो.
Published on: 21 November 2021, 07:40 IST