Others News

आज आपण या पहिल्या भागामध्ये शंखी गोगलगाय गाईची ओळख व तिच्या नुकसानीचा प्रकार याबद्दल काही बाबी जाणून घेऊ.

Updated on 02 July, 2022 9:41 PM IST

आज आपण या पहिल्या भागामध्ये शंखी गोगलगाय गाईची ओळख व तिच्या नुकसानीचा प्रकार याबद्दल काही बाबी जाणून घेऊ.(A) शंखि गोगलगाईची ओळख : शंकी गोगलगाय ही मऊ शरीर असलेली व पूर्णतः शंखाच्या आत राहणारी कीड आहे. आपण बऱ्याच वेळा लांबोळके जे शंख पाहतो त्या शंका च्या आत मध्ये राहणारी ही कीड आहे. शंखी गोगलगाय या किडीला पाय नसतात. शंखी गोगलगायीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी गोगलगाय गर्द करड्या, फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात.ही कीड शरीराचा अग्रभाग शंखाच्या बाहेर काढून सरपटत चालते त्यावेळी शंख तिच्या शरीराबाहेर सरकतो. शंकी गोगलगाय या किडीचा आकार अत्यंत सूक्ष्म ते साधारणता 1.5 मिटर लांब एवढा असू शकतो. 

शंखी गोगलगाय ही बहुभक्षीय कीड असून विविध पाचशे वनस्पती वर ती उपजीविका करू शकते. शंखी गोगलगाय या किडीला दोन डोळे तसेच दोन ते चार अस्थी विरहित सोंडी (Tentacles) असतात. ही कीड फुफ्फुसाद्वारे श्वास घेते. ही कीड ओल्या जमिनीवर आद्र वातावरणात सावलीत परंतु अनुकूल उष्णतामानात राहते. शंकी गोगलगाय या पिढीला पाऊस, ढगाळ वातावरण जास्त आद्रता व कमी तापमान म्हणजे साधारणतः 20 ते 32 अंश तापमान पोषक ठरू शकते ,शंखी गोगलगाय हा थंड रक्ताचा प्राणी असून या विपरीत हवामानात झोपलेल्या अवस्थेमध्ये शंखाच्या आत पूर्ण आकुंचित करून राहतात आणि अनुकूल हवामान झाल्याबरोबर झोपेतून परत सचेतन अवस्थेमध्ये परततात. 

पुष्कळशा शंखी गोगलगाय दिवसात झाडाखाली जमिनीत गळून पडलेल्या पानाखाली मऊ भुसभुशीत जमिनीमध्ये किंवा झुडपांमध्ये लपलेल्या दिसतात. या शंकी वर्गातील गोगलगायी पैकी सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे "आफ्रिकन शंखि" (Giant African Snail) होय. ही जमिनी वरील सर्वात मोठी शंखी गोगलगाय असून या गोगलगायी ची पूर्ण वाढ झालेली शंखी गोगलगाय 15 ते 17.5 सेंटीमीटर लांब असते. ही शंकी गोगलगाय साधारणता तीन वर्ष जगू शकते आणि या कालावधीत ती साधारणता एक हजार अंडी घालू शकते. शंकी गोगलगाय बहू लिंगी असून ही कीड साधारण 80 ते 100 अंडी एकाच वेळी झाडाच्या खोडाच्या जवळ किंवा मुळाजवळ जमिनीत घालते. या किडीची अंडी गोलाकृती पांढरी साबुदाण्यासारखी असतात.(B) शंखि गोगलगायीचा नुकसानीचा प्रकार : शंखी गोगलगाय रात्रीच्यावेळी कार्यक्षम असते.

दिवसा किंवा सूर्यप्रकाशात या गोगलगायी सावलीमध्ये झाडाच्या पानाच्या खाली , पालापाचोळ्याचे खाली, गवतात किंवा जमिनीत लपून बसतात. या शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव भाजीपाल्याची रोपे व पिके उदाहरणार्थ भेंडी वांगी दोडक्याची वेल वाल काकडी मिरची पानकोबी फुलकोबी व इतर भाजीपाला पिके तसेच पपई संत्रा केळी यासारख्या फळ पिकावर तसेच इतर अन्नधान्याची व गळीतधान्याची पिके यावर आढळून येऊ शकतो. या शंखी गोगलगायईची बाल्य व प्रौढावस्था भेंडी टोमॅटो मिरची पानकोबी फुलकोबी कपाशी ज्वारी मका तसेच ऊस पिकात पिकाला येणारे नवांकुर खाऊन टाकू शकते तसेच सोयाबीन गहू भात वांगी वेलवर्गीय पिके पपई संत्रा केळी सारख्या पिकात ही शंकी गोगलगाय पोषक वातावरणात पिकांची पाने व इतर कोवळा भाग कुडतडून खाते व त्यामुळे व त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.

       

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Integrated management of pests like conch snails and their collective methods.
Published on: 02 July 2022, 09:41 IST