Others News

कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षापासून अनेक जणांचे रोजगार गेले. बेरोजगारीची कुऱ्हाड अनेक जणांवर कोसळली. तसेच बऱ्याच प्रमाणात नवीन नोकरीच्या संधी देखील कमी झाल्या होत्या.

Updated on 15 January, 2022 12:58 PM IST

कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षापासून अनेक जणांचे रोजगार गेले. बेरोजगारीची कुऱ्हाड अनेक जणांवर  कोसळली. तसेच बऱ्याच प्रमाणात नवीन नोकरीच्या संधी देखील कमी झाल्या होत्या.

परंतु अशातच आता एक आशादायी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या नवीन वर्षात आयटी क्षेत्रात एक लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या जसे की टीसीएस,विप्रो आणि इन्फोसिस या आर्थिक वर्षात जवळपास 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. या कंपन्यांनी त्यांचा तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर ही घोषणा केली.

 यादरम्यान देशातील तीन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी 2021 मध्ये विक्रमी एक लाख सात हजार कर्मचारी नियुक्त केले होते. 2020 या वर्षाचा विचार केला तर ही संख्या फक्त 31 हजार होती.

असे कंपन्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. कोरोना महामारी च्या कालावधीत देश डिजिटल मोड कडे वळत असल्याने नोकरभरतीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय या कंपन्यांनी भरती वाढण्यामागे अट्रीशनच्या वाढत्या संख्येचा ही मोठा हातभार आहे. त्यामुळे तरुणांना ह्या नोकऱ्यांच्या संधी चालून आली आहे. विप्रो FY23 मध्ये सुमारे 30 हजार फ्रेशरची भरती करण्याची योजना आखत आहे. याबद्दल बोलताना कंपनीने सांगितले की मजबूत मागणीचे वातावरण व्यवस्थापित करण्यात पुरवठा अडथळा होणार नाही याची खात्री करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

तसेच बुधवारी टीसीएस ने देखील सांगितले की कंपनी आपल्या आक्रमक भरती मोहीम सुरू ठेवेल. विशेष म्हणजे टीसीएससी अलिकडेच तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांचा टप्पा गाठला आहे. टीसीएससी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीने मार्चपर्यंत 34 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु हे लक्ष कंपनीने आदेश पूर्ण केले आहे. त्या सोबतच इन्फोसिस देखील चालू आर्थिक वर्षात 55 हजार पेक्षा जास्त फ्रेशर्सची भरती करण्याचे प्लॅनिंग करत आहे.

English Summary: infosys,wipro and tcs recruitment of 1 lakh candidate in financial year
Published on: 15 January 2022, 12:58 IST