Others News

आता सरकारच्या वतीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने असा स्टोव्ह लॉन्च केला आहे, जो सौरऊर्जेवर चालत आहे. म्हणजे यासाठी गॅस किंवा लाकडाची गरज भासणार नाही. यामुळे तो फायदेशीर ठरत आहे. हा स्टोव्ह सूर्याच्या किरणांनी चार्ज होईल.

Updated on 10 July, 2022 1:29 PM IST

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे सध्या अनेकजण वेगवेगळ्या गोष्टींना पर्याय शोधत आहेत. आता सरकारच्या वतीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने असा स्टोव्ह लॉन्च केला आहे, जो सौरऊर्जेवर चालत आहे. म्हणजे यासाठी गॅस किंवा लाकडाची गरज भासणार नाही. यामुळे तो फायदेशीर ठरत आहे.

हा स्टोव्ह सूर्याच्या किरणांनी चार्ज होईल, तसेच त्यानंतर तुम्ही त्यावर स्वयंपाक करू शकाल. सूर्या नूतन चुल्हा असे या स्टोव्हचे नाव आहे, जो चार्ज करण्यायोग्य आहे आणि तुम्ही तो घरामध्ये वापरू शकता. तसेच तो तुम्ही कुठेही ठेवू शकता. आणि त्याला मोठ्या प्रमाणावर खर्च देणार येणार नाही. यावर स्वयंपाक करणे देखील अगदी सोप्पे आहे. कोणीही तो सहज हाताळू शकणार आहे.

दरम्यान, दिल्लीतील मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या निवासस्थानी हा लॉन्च करण्यात आला, नंतर यावर अन्न देखील शिजवले गेले. यामध्ये एक केबल जोडलेली आहे आणि ही केबल छतावर असलेल्या सोलर प्लेटला जोडलेली आहे. सौर प्लेटद्वारे निर्माण होणारी ऊर्जा केबल्सद्वारे स्टोव्हपर्यंत पोहोचते. आणि यामुळे त्याठिकाणी ऊर्जा निर्माण होते.

अशी शेती केली तर शेतकऱ्यांची पण लग्न होतील!! पट्ठ्याने बँक मॅनेजरच्या नोकरी सोडून केली शेती, आज लाखो कमवतात

याचे आयुष्य 10 वर्षे असल्याचे म्हटले जाते. याला कोणताही अतिरिक्त खर्च देखील नाही. सध्या या स्टोव्हची चाचणी पूर्ण झाली आहे. याची किंमत 18 हजार ते 30 हजार रुपये असणार आहे. मात्र त्यानंतर याला 10 वर्ष काहीच खर्च येणार नाही. याच्या किमती पुढे कमी देखील होऊ शकतात. यावर सबसिडी देखील देण्याचा सरकारला विचार आहे. यानंतर त्याची किंमत ही 10 हजारांपेक्षा कमी होईल.

महत्त्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेवटची संधी! 90 टक्के अनुदानावर शेतात सौरपंप बसवण्यासाठी नाव नोंदणी सुरू, वाचा सविस्तर
राज्यात पावसाचा धुमाकूळ, 30 धरणे भरली, शेतकऱ्यांची काळजी मिटली..
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

English Summary: inflation gas supply gone! Solar cooking grate launch
Published on: 10 July 2022, 01:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)