Others News

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. योजना राज्यात फेब्रुवारी 2019 पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या योजनेसाठी पात्रतेच्या काही अटी आहेत जसे की, आयकर दाते, सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी, पेन्शन धारक, सीए, डॉक्टर, दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेले शेतकरी इत्यादी हे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.

Updated on 15 February, 2021 9:40 PM IST

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. योजना राज्यात फेब्रुवारी 2019 पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या योजनेसाठी पात्रतेच्या काही अटी आहेत जसे की, आयकर दाते,  सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी, पेन्शन धारक, सीए, डॉक्टर, दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेले शेतकरी इत्यादी हे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.

परंतु अशा शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर माहिती भरून या योजनेचा लाभ घेतला. अशा शेतकऱ्याकडून शासनाने आता वसुली सुरू केली आहे.या सगळ्या लाभ देण्यात आलेल्या पैकी 4646 शेतकरी हे आयकर भरणारे निघाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल चार कोटी अठरा लाख रुपये रुपयांचा निधी टाकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. अशा शेतकऱ्यांना नोटीस बजावून लाभ घेतलेली रक्कम त्वरित भरावे अशा सूचना करण्यात आले आहेत. परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी उचल हप्ता परत दिला नाही.

हेही वाचा : प्रधान मंत्री किसान सम्मान निधि योजना : 70 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

त्यामुळे आता प्रशासनाने आता कारवाईची तयारी सुरू करून ज्या शेतकऱ्यांनी रक्कम परत केली नाही अशा शेतकऱ्यांच्या सातबार्यावर बोजा चढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English Summary: Ineligible farmers of PM Kisan Yojana debit on you
Published on: 15 February 2021, 09:37 IST