Others News

सध्या देशात सर्वत्र पेट्रोलचे भाव गगनभरारी घेत आहेत, त्यामुळे अनेक लोक उत्तम मायलेज असलेल्या बाईक खरेदी करण्यास पसंती दर्शवित आहेत. मध्यमवर्गीय लोक नेहमीच चांगल्या मायलेजवाल्या बाईकची खरेदी करणे पसंत करतात जर आपणही स्वस्तात चांगली मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी विशेष तुमच्यासाठी, आज आम्ही आपल्यासाठी भारतातील सर्वात जास्त मायलेज देणार्‍या आणि स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या बाईकची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रानो चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील सर्वात जास्त मायलेज देणार्‍या बाईक.

Updated on 19 February, 2022 12:46 PM IST

हिरो एचएफ 100

हीरो हि देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे. हिरो कंपनी सर्वात जास्त मोटर बाईक विक्री करत असते. आज आपण हिरो कंपनीच्या हिरो एचएफ 100 या गाडी विषयी जाणून घेणार आहोत. कंपनीने या गाडीमध्ये 97.2 सीसीचे इंजिन उपलब्ध करून दिले आहे हे इंजन 7.91 पावर आणि 8.05 nm चा टोर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या गाडीला चार स्पीड गेअर बॉक्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या मते, ही गाडी 70 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतच मायलेज देण्यास सक्षम आहे. या गाडीची सुरुवाती एक्स शोरूम किंमत 51 हजार रुपये एवढी आहे. 

बजाज सिटी 100 

देशात हिरो नंतर सर्वात जास्त बजाज कंपनीच्या बाईक विक्री होत असतात. बजाज कंपनी आपल्या स्टायलिश लुकवाल्या गाड्यांसाठी ओळखली जाते आज आपण या कंपनीची सर्वात जास्त मायलेज देणारी गाडी म्हणजेच सिटी 100 विषयी जाणून घेणार आहोत.सिटी 100 हि बजाज कंपनीची सर्वात सवस्त आणि जास्त मायलेज देणारी बाईक आहे.या गाडीमध्ये 102 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. तसेच या गाडीला चार स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. या गाडीचे इंजिन 7.9 पावर आणि 8.34 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या मते, ही गाडी 90 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 53 हजार 696 एवढी आहे.

बजाज प्लेटिना 100 

बजाज कंपनीची हि एक दमदार आणि स्टायलिश लुकसाठी ओळखली जाणारी बाईक आहे. या गाडीला 102 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे 7.9 पीएस पॉवर आणि 8.3 nm टोर्क जेनरेट करण्यास सक्षम आहे. या गाडीला 4 स्पीड गियर बॉक्स देण्यात आले आहे.हि गाडी 97 किमी प्रती लिटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 59 हजार 309 रुपये एवढी आहे.

English Summary: India's cheapest and best mileage bike
Published on: 19 February 2022, 12:46 IST