रेल्वेमधून (Indian Railway) प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने बर्थशी संबंधित अनेक नियम केले आहेत. त्यांना जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही पाहिलं असेल की अनेक वेळा ट्रेनमध्ये तुमच्या मनाप्रमाणे बर्थ मिळत नाही. कारण रेल्वेमध्ये सीट्स मर्यादित असतात. मधल्या बर्थवर झोपण्यावरूनही वाद होतात. अशा परिस्थितीत, प्रवास करताना कोणते नियम पाळले पाहिजेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
टीसीचे नियम
रेल्वेचा हा नियम तुम्हाला प्रवासादरम्यानही मदत करू शकतो. TTE तुम्हाला रात्री 10 नंतर त्रास देऊ शकत नाही हे जाणून घ्या. रेल्वेच्या नियमांनुसार टीटीई सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच तिकीट तपासू शकतात. मात्र, रात्री १० नंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू होणार नाही.
भारतीय रेल्वेचा नियम
प्रवासादरम्यान लोक अनेकदा मधला बर्थ घेण्याचे टाळतात. कारण अनेक वेळा लोअर बर्थवरचे प्रवासी रात्री उशिरापर्यंत बसतात. त्यामुळे मधल्या बर्थवर प्रवाशांना त्रास होतो. याशिवाय अनेक वेळा मधल्या बर्थचे प्रवासी प्रवास सुरू होताच बर्थ उघडतात. त्यामुळे खालच्या बर्थवर बसलेल्या प्रवाशांना त्रास होतो.
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार मधला बर्थवर असलेला प्रवासी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बर्थ उघडून झोपू शकतो. जर मधल्या बर्थच्या प्रवाशाने रात्री 10 वाजण्यापूर्वी त्याचा बर्थ उघडला तर तुम्ही त्याला थांबवू शकता. त्याचप्रमाणे जर तुमचा मधला बर्थ असेल आणि खालच्या बर्थचा प्रवासी तुम्हाला बर्थ उघडण्यापासून रोखत असेल तर तुम्ही त्याला हा रेल्वे नियम सांगून तुमचा बर्थ उघडू शकता.
7/12 : खाते उतारे आणि आठ अ उतारे ऑनलाइन पद्धतीने कसे पाहणार?
मी सकाळी किती वाजेपर्यंत मधल्या बर्थवर झोपू शकतो?
विशेष म्हणजे सकाळी 6 नंतर मधल्या बर्थच्या प्रवाशाने आपला बर्थ खाली घेणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रवाशांना खालच्या बर्थवर बसता येईल. खालच्या बर्थच्या प्रवाशांनाही उठून बसावे लागेल.
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! DA वाढू शकतो, जाणून घ्या किती वाढणार...
Published on: 08 May 2022, 11:47 IST