पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने रेल कौशल विकास योजना सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून रेल्वेबेरोजगार तरुणांनानिरनिराळ्या क्षेत्रात असलेले कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकवणार आहे.त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील,असे सांगितले जात आहे.
.या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन इत्यादी क्षेत्रातील कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधित क्षेत्रातट्रेड मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तरुणांना रोजगार मिळू शकेल असा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे.
हे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क आहे.तरुणांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्कया माध्यमातून घेतले जाणार नाही.प्रशिक्षणादरम्यान लागणार्या सगळ्या सुविधा तरुणांना पुरवल्या जाणार आहे.भारतातील जवळजवळ पन्नास हजारतरुणांना सुमारे शंभर दिवसांचे प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
.या योजनेमार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी चे वयोमर्यादा 18 ते 35 असून या वयोगटातील कोणतेही तरुण या प्रशिक्षणात भाग घेऊ शकतात.
रेल कौशल विकास योजनेचे वैशिष्ट्य
- अर्जदाराचे वय 18 ते 35 दरम्यान असावे.
- या प्रशिक्षणासाठी निवड ही हायस्कूल किंवा गुणवत्तेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केलेजाईल.
- या योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या आरक्षण लागू नाही.
- प्रशिक्षणादरम्यान तरुणांना वर्गात 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला परीक्षा द्यावी लागेल ज्यात लेखी परीक्षेत किमान 55 टक्के आणि प्रॅक्टिकल परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल.
- हे प्रशिक्षण विनामूल्य आहे.
- परंतु प्रशिक्षणादरम्यान राहण्याचा,जेवण्याचा वगैरे इतर खर्चउमेदवाराला स्वतःला करायला लागेल.
आवश्यक कागदपत्रे
- प्रशिक्षणार्थींना स्वतःच्या आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- वयाच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- दहावीचे प्रमाणपत्र
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो आणि मोबाईल क्रमांक लागेल.
Published on: 19 September 2021, 08:05 IST