Others News

इंडियन कोस्ट गार्ड मध्ये असिस्टंट कमांडंट या पदासाठी पन्नास जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 4 जुलैपासून सुरू होणार आहे. इंडियन कोस्ट गार्ड च्या नोटिफिकेशन नुसार असिस्टंट कमांडर या पदासाठी भरती होणार असून पात्र उमेदवार भारतीय कोस्ट गार्डच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या संकेत स्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात.

Updated on 26 June, 2021 8:48 PM IST

 या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ही चार जुलै ते 14 जुलै दरम्यान आहे. इच्छुक उमेदवार इंडियन कोस्ट गार्ड च्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे आपली नोंदणी करू शकतात. प्राप्त माहितीनुसार एकूण असिस्टंट कमांडचे 50 जागांवर भरती होणार असून यामध्ये जी डी साठी चाळीस जागा भरल्या जातील. यामध्ये 11 जागा खुल्या, पी डब्ल्यू एस साठी 3, ओबीसीसाठी 7, एस सी साठी 6, एसटीसाठी 13 जागा निश्चित करण्यात आले आहेत. टेक्निकल इंजिनीअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी दहा जागांवर भरती होणार आहे.

 शैक्षणिक पात्रता

  • इंडियन कोस्ट गार्ड मध्ये जनरल ड्युटी या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे पदवीधर असावेत. तसेच बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत.
  • टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्री अंड प्रोडक्शन, ऑटोमोटिव्ह किंवा मरीन आर्किटेक्चर मध्ये पदवीधर असावेत.

तसेच इंडियन कोस्ट गार्ड च्या नोटिफिकेशन नुसार नाविक( जनरल ड्युटी ), नाविक  ( डोमेस्टिक ब्रांच ), यांत्रिक( मेकॅनिकल ), यांत्रिक( इलेक्ट्रिकल ) आणि यांत्रिक( इलेक्ट्रॉनिक्स ) पदांसाठी देखील भरती होणार आहे.

 पदसंख्या

  • नाविक ( जनरल ड्युटी ): 260
  • नाविक( डोमेस्टिक ब्रांच ): 50
  • यांत्रिक ( मेकॅनिकल ): 20
  • यांत्रिक( इलेक्ट्रिकल ): 13
  • यांत्रिक( इलेक्ट्रॉनिक्स ): 7

 माहिती स्त्रोत- टीव्ही नाईन मराठी

English Summary: indian coastguard recruitment
Published on: 26 June 2021, 08:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)