सध्या वेगवेगळ्या स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी अनेक प्रकारचे स्मार्टफोन सध्या बाजारात लॉन्च करण्याचा धडाका लावलेला आहे. याच पार्श्वभूमीवर मोबाईल फोन निर्मिती क्षेत्रातील मोटोरोला कंपनी ने देखील 3 ऑक्टोबर रोजी 'Moto G72' लॉच करण्याची घोषणा केली असून या फोनसाठी फ्लिपकार्ट वर पेज लाईव्ह करण्यात आले आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत या बद्दल या लेखात माहिती घेऊ.
'Moto G72' स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
या मोबाईल मध्ये पीओएलईडी डिस्प्ले देण्यात आला असून 120 हर्ट्स रिफ्रेशर रेट आणि 576 हर्ट्स सॅम्पलिंग रेट दिला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन स्क्रीन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सोबत आहे.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड बारावर लॉन्च होणार आहे. तसेच ऑक्टाकोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हिलिओ जी 99 चिपसेटवर काम करेल. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिले जाणार आहे. उत्तम फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॉलिटी साठी ट्रिपल रियर कॅमेरा यामध्ये असणार असून प्रायमरी सेंसर एकशे आठ मेगापिक्सेलचा असणार आहे.
नक्की वाचा:Mobile World: विवो कंपनीच्या 'या' चार स्मार्टफोनवर मिळत आहे जबरदस्त ऑफर,वाचा डिटेल्स
मागच्या पॅनेलवर एक अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मायक्रो सेंसर यामध्ये असणार आहे. चार्जिंग पावर साठी यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देखील असणार आहे.हा स्मार्टफोन मेटेवराईट, ग्रे आणि पोलर ब्ल्यू या तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
तीन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता या फोनचे अधिकृतपणे लॉन्चिंग होईल व नंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
या फोनची किंमत
Moto G72 या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ पंधरा हजार रुपयांच्या बजेटमध्ये असणार आहे.
नक्की वाचा:काय सांगता! 'या' ठिकाणी पेट्रोल 29 रुपये आणि डिझेल 18 रुपये मिळतं स्वस्त, डिटेल्स वाचा
Published on: 29 September 2022, 02:05 IST