Others News

कोणताही व्यवसाय असो, त्यात महत्त्वाचे म्हणजे विक्री. मग आपण एखादे उत्पादन किंवा सर्विस विकू शकता.

Updated on 23 April, 2022 12:35 PM IST
कोणताही व्यवसाय असो, त्यात महत्त्वाचे म्हणजे विक्री. मग आपण एखादे उत्पादन किंवा सर्विस विकू शकता. त्यामुळे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं कि सर्वात आधी लोकांच्या गरजा काय आहे आणि आपण लोकांना काय विकू शकतो, ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. याच अभ्यासातुन कोणता व्यवसाय करावा याचे उत्तर आपोआपच मिळेल. नवीन उद्योग करायचा म्हटलं कि त्यासाठी भांडवल, मार्केटिंग स्किल, अनुभव ह्या सर्व गोष्टींची आवश्यक्ता असते. पण असे काही व्यवसाय आहेत कि जिथे ह्या गोष्टी नसल्या, तरी तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. मुख्यतः ग्रामीण भागात तुम्ही काय उद्योग करू शकता हे आपण ठरवा.
१. दैनंदिन जीवनात लोकांना अनेक खाद्य वस्तूंची आवश्यकता असते. अश्या रोज लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात घेऊन तुम्ही किराणा दुकान / किरकोळ स्टोअर चालू करू शकता. एका लहानशा गावात व्यवसाय चालवण्यासाठी आणि उत्पन्न मिळण्यासाठी हा चांगला मार्ग आहे. एकदा का लोकांना गावातच खरेदीची सवय लागली कि मग व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही.
२. गावात आज पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या गहन होत चालली आहे. त्यामुळे पाणी रिफिल स्टेशन / मोबाईल व्हॅन हा एक चांगला व्यवसाय आहे. अश्या मोबाईल प्युरिफिकेशन व्हॅन सिस्टिम खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा पण उपलबद्ध आहे. ज्या गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे हा खरोखर फायदेशीर व्यवसाय आहे.
३. मोबाईल आज चैन न राहता गरजेचा झाला आहे. ग्रामीण भागात सुद्धा लोकांकडे सर्रास मोबाईल दिसून येतो. मोबाईल साठी लागणाऱ्या ऍक्सेसरीज, सिम कार्ड, रिचार्ज व्हाउचर्स आणि रिपेरिंग सर्विस यांची मागणी पण खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरु करायला गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त आहे.Smartelix-Rural-Variety-Store-India

४. लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती, आइस्क्रीम सगळ्यांनाच आवडते. जर तुमच्या गावाच्या आसपास जवळ कुठे आइस्क्रीम शॉप नसेल तर तुम्ही आइस्क्रीम शॉप हा रिटेलिंग व्यवसाय यशस्वीरित्या प्रारंभ करू शकता. अनेक मोठ्या ब्रॅण्ड च्या फ्रँचायसी घेऊ शकता.

५. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न, त्यात खवय्यांची कुठेच काही कमी नाही. त्यामुळे चवीने खाणारे कधी कमी होत नाही. त्यामुळे एखादं हॉटेल / स्टॉल सुरु करू शकता. अगदी चहा, भेळ, मिसळ, भजी, वडा पाव, तर्री वडा, सामोसे यासारख्या भरपूर खपणाऱ्या खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरु करू शकता. पुढे जाऊन याचे रूपांतर मोठ्या हॉटेल मधे करून प्रगती करू शकता. तसे पहिले तर हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही.

६. आपण एका लहानशा गावात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास, एक पुस्तक स्टोअर उघडू शकता. या स्टोअर मधे तुम्ही विविध लेखकांची विविध शैलींची पुस्तके विकू शकता अथवा भाड्याने देऊ शकता.

७. रिटेल फार्मसी स्टोअर हा एक आदर्श किरकोळ व्यवसाय. आपण जर परवानाधारक फार्मसिस्ट असल्यास किंवा एखाद्याचे लायसन्स भाडेतत्त्वावर घेऊन आपण रिटेल फार्मसी स्टोअर सुरु करू शकता. यात विविध निर्मात्यांकडून बनवलेली उत्पादने (औषधे आणि वैद्यकीय पुरवठा) तसेच इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आपण विक्री करू शकता.Smartelix-Photo-Studio

८. लोकांना रोज अनेक वस्तूंची गरज भासते. उदा. वह्या, पेन, रिफील, ग्रीटिंग्ज, गिफ्ट, खेळणी, मेहेंदी, ब्युटी क्रीम्स इत्यादी. अश्या सगळ्या वस्तू आपण जनरल / व्हरायटी स्टोअर च्या माध्यमातून विक्री करू शकता. ज्या ज्या वस्तू लोकांना दररोज लागतात त्या तुम्ही इथे उपलब्ध करून विकू शकता.

९. जर तुम्हाला संगणक दुरुस्ती चे ज्ञान असेल तर तुम्ही संगणकाची दुरुस्ती (लॅपटॉप आणि डेस्कटॉप) हा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायात आपल्याला फक्त संगणक दुरुस्ती कौशल्ये प्राप्त करणे, आवश्यक दुरूस्तीची साधने खरेदी करणे आणि नंतर एका चांगल्या ठिकाणी दुकान उघडणे आवश्यक आहे. या प्रकारच्या सेवांसाठी खूप मागणी आहे.

१०. सोशल मिडिया च्या वाढत्या वापरामुळे चांगले नव-नविन फोटो साठी खूप मागणी वाढत आहे. तुम्हाला जर फोटोग्राफी करायाला आवडत असेल आणि फोटो काढण्यासाठी लागणारे कौशल्य जर तुमच्याकडे असेल, तर फोटोग्राफी व्यवसाय तुम्ही लहानशा गावात यशस्वीरित्या प्रारंभ करू शकतो. एक चांगला स्टुडिओसह छायाचित्रकार म्हणून आपण केवळ आपल्या फोटो स्टुडिओमध्येच लोकांना आकर्षित करणार नाही, तर आपल्याला विवाह समारंभ, वाढदिवस, राजकीय सभा, मैफिली इत्यादीसारख्या कार्यक्रमांच्या ऑर्डर पण घेता येतील.

११. चांगले दिसणे प्रत्येकालाच आवडते. आजच्या तरुण, तरुणींमध्ये मेकअप करण्याची खूप क्रेझ आहे. याच वाढत्या गरजेचा फायदा घेऊन तुम्ही ब्युटी सलोन सुरु करू शकता. हा एक अत्यंत कमी गुंतवणुकीचा व अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला आधी ब्युटी सलोन चा कोर्से पूर्ण करावा लागेल.

१३. आज लग्नसराई हि वर्षातून किमान सात-आठ महिने चालते. लग्नात मंडप, लाईट, डेकोरेशन सेट, जेनरेटर, भांडी अश्या अनेक गोष्टी लागतात. यापैकी कोणतेही साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय सुद्धा चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो.

१४. बेकरी प्रोडक्ट जसे पाव, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट आणखी बरेच काही आपण स्वतः बनवून विकू शकता. स्वतः बनवणे शक्य नसल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही मोठ्या बेकरी असतील त्यांच्याकडून होलसेल मध्ये विकत घेऊन स्थानिक बाजारात विकु शकता.

व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा. काय विकायचं ठरवा, आणि कामाला लागा.

    

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

9923132233

English Summary: In rural place do this business and earn more money
Published on: 23 April 2022, 12:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)