शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या नवीन योजना काढत असते जे की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. सरकारचा शेतकऱ्यांबद्धल एकच उद्देश आहे की कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न निघावे. या कृषी क्षेत्रामध्ये आता ड्रोन ने आपले महत्वाचे पाऊल ठेवले आहे जे की ड्रोन हे एक आधुनिक यंत्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. ड्रोन च्या वापराने शेतीसाठी लागणार जो खर्च आहे तसेच जो वेळ खर्ची होतो तो वेळ सुद्धा ड्रोन च्या आधारे वाचनार आहे. आज आपण ड्रोनद्वारे शेतीस होणारे फायदे पाहणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्याना याचा फायदा किती होणार आहे हे समजणार आहे.
ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे :
१. सध्याच्या काळात शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत जे की प्रत्येक शेतकरी आपल्या आपल्या शेतीत विविध प्रयोग करत असल्यामुळे शेतीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. तसेच आजकाल मजुरी खर्च सुद्धा जास्त वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अगदी शेतकऱ्यांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा यासाठी खूप फायदा होणार आहे जे की ड्रोनमुळे शेतकऱ्यांचा खर्च ही वाचणार आहे तसेच वेळेची सुद्धा बचत होणार आहे.
२. सर्वसामान्य एका व्यक्तीने हातपंपद्वारे शेतामध्ये फवारणी करायची म्हणले तर जवळपास एका दिवसात फक्त तो व्यक्ती एक ते दोन एकर शेताची फवारणी करू शकतो. जे ने हातपंपाद्वारे फवारणी केल्यास शेतकऱ्याचा वेळ ही वाया जातो तसेच शेतकऱ्यास जास्त कष्ट देखील पडते मात्र ड्रोन द्वारे फवारणी केली तर एका दिवसात सुमारे १० एकर क्षेत्रात फवारणी होते. ड्रोनमुळे फवारणी केली तर वेळ ही वाचते आणि फवारणी चा पट्टा सुद्धा मोठा असतो.
३. शेतकरी आपल्या आरोग्याचा विचार न करता शेतीला रासायनिक औषधे आणून फवारणी करत असतो जे की या फवारणीसाठी शेतकऱ्याला स्वतः शेतात जावे लागते. युरिया सारखे खतांची फवारणी तर तो आपल्या हाताने करत असतो त्यामुळे शेतकऱ्याचे दिवसेंदिवस आरोग्य बिघडत असते. मात्र ड्रोन च्या साहायाने जर फवारणी केली तर एकसमान शेतीवर फवारणी होते तसेच एका दिवसामध्ये तुम्ही १० एकर क्षेत्र फवारणी करून सोडता. ड्रोनआधारे फवारणी केली तर शेतकऱ्यांच्या आरोग्याला सुद्धा नुकसान पोहचत नाही तसेच वेळ ही वाचतो.
Published on: 19 February 2022, 10:09 IST