महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. राज्यामध्ये लवकरच दुसऱ्या टप्प्यातील 7200 पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5200 पदांसाठी असलेली भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच 7200 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीदिली. पाटील या शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांसाठी असलेल्या भरती ला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील 5200 पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.लेखी परीक्षा चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी झाली असून त्यांचे आता अंतिम यादी करण्याचे काम सुरू आहे.ही पहिल्या टप्प्यातील भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला 7200 पदांच्या भरतीला सुरुवात करायचे आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात पाच हजार दोनशे पदांची भरती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात 7200 पोलिस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरू करण्यात येईल असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
Published on: 29 January 2022, 10:51 IST