जर आपण नोकरीपेक्षा व्यक्ती असाल आणि आपल्याला नोकरीतून मिळणाऱ्या पैशात उदरनिर्वाह करणे कठीण होत असेल आणि व्यवसाय करू इच्छित असाल किंवा आपल्याला स्वतःचा साईड बिजनेस स्टार्ट करायचा असेल आम्ही खास आपल्यासाठी आज एक भन्नाट अशी बिजनेसची कल्पना घेऊन आलो आहोत. हा बिजनेस आपण अगदी कमी पैशात सुरू करू शकता आणि मोठी तगडी कमाई करू शकता. जर आपला इंटरेस्ट ट्रॅव्हल्स सेक्टर मध्ये असेल किंवा आपण वाहन चालवण्यात इंटरेस्टेड असाल किंवा आपल्याला यासंबंधी व्यवसाय करायचं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे आपली गाडी भाड्यावर कंपनीला देणे, आपण एखादी सेकंड हॅन्ड गाडी/कार घेऊन आपण ओला सारख्या कंपनीसोबत हा व्यवसाय सुरु करू शकता. आपण या व्यवसायाद्वारे rs.50000 मंथली कमाई करू शकता
जाणून घ्या कसा करणार हा व्यवसाय
मित्रांनो ओला कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्लिट अटॅचची सुविधा प्रोव्हाइड करते म्हणजे आपण या कंपनीत एक नव्हे तर आपल्या मर्जीनुसार अनेक गाड्या/कार जोडू शकता. म्हणून आपण जेवढ्या कार या कंपनीला जोडणार तेवढा आपला फायदा होईल.
या कागदपत्रांची आवश्यकता लागेल
ओला सोबत आपली कार जोडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, रद्द केलेला चेक, आधार कार्ड, घराचा पत्ता लागेल. याशिवाय, कारची कागदपत्रे, जसे की वाहन आरसी, वाहन परमिट, कार विमा, या सर्वांची आवश्यकता असेल. त्याचबरोबर चालकाच्या कागदपत्रांमध्ये डीएल, आधार कार्ड, घराचा पत्ता आवश्यक आहे या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपण हा व्यवसाय सहजरीत्या सुरु करू शकता.
प्रत्येक कार देईल हजारोंचा नफा
ओला अनेक वर्षांपासून ड्रायव्हर पार्टनर्स प्रोग्राम चालवत आहे. जर आपण आपली कार ओलाशी जोडली असेल तर एका गाडीचा सर्व खर्च वजा केल्यावर तुम्हाला दरमहा 40,000 ते 45,000 रुपये मिळतील. तुम्ही अशा कितीही गाड्या जोडू शकता, सर्व गाड्यांची एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला ड्रायव्हरचा पगार द्यावा लागेल.
Published on: 20 December 2021, 01:40 IST