Others News

ट्रॅफिक पोलिसांनी गाडी आडवणेत्याचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो.बऱ्याचदा असे होते कि ट्राफिक पोलीस गाडीची चावी काढून घेतात.परंतु अशा पद्धतीचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना आहे का? हे माहित असणे फार गरजेचे आहे.

Updated on 17 March, 2022 1:19 PM IST

ट्रॅफिक पोलिसांनी गाडी आडवणे त्याचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो.बऱ्याचदा असे होते कि ट्राफिक पोलीस गाडीची चावी काढून घेतात.परंतु अशा पद्धतीचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना आहे का? हे माहित असणे फार गरजेचे आहे.

या प्रश्नाचे उत्तर आहे की वाहतूक पोलिसांना तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार नाही.तेतुमच्या चालू गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही.जर पोलिसांनी तसे केले तर तुम्ही तक्रार करू शकता.परंतु त्यावेळी तुमचे वर्तन हे अतिशय चांगले असले पाहिजे.परंतु वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे चुकीचे असते.नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.खालील काही वाहन अधिनियमातील कलमांचे/नियमांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो.

 याबाबतीत ठरू शकतो गुन्हा

  • जर तुम्ही विना सीट बेल्ट लावता कार ड्राइव्ह करत असाल तर
  • दुचाकी चालवताना हेल्मेट नसेल तर
  • तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तेव्हा
  • वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास
  • तुम्ही जे वाहन चालवत आहात त्याचा इन्शुरन्स नसल्यास
  • पियुसी म्हणजेच वैधपोलुशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट नसल्यास
  • मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालवत असल्यास
  • तसेच प्रवासी वाहनांमध्ये अतिरिक्त प्रवासी वाहतूक केल्यासदंडात्मक कारवाई होऊ शकते.

काही महत्वाचे नियम

  • जर वाहतूक पोलिसांनी तुमचीगाडी अडवली तर काळजी करण्याचे कारण नाही.परंतु एक सुजाण नागरिक म्हणून वाहतुकीचे नियम व तुमच्या अधिकारतुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
  • वाहतूक पोलिसांनी तुमची गाडी अडवली व तुमच्याकडे दंडाचे मागणी केली तर पोलिसांकडे चलन बुककिंवा इ चलन मशीन असणे बंधनकारक आहे. जर संबंधित पोलिसांकडे या दोन्ही पैकी एक जरी नसेल तर ते तुमच्या कडून दंड वसूल करू शकत नाहीत.
  • वाहतूक पोलिसांनी गाडी अडवल्यास पोलिसांचे सहकार्य करणे गरजेचे आहे.जर तुमच्या कडून कुठल्याही प्रकारची चूक झाली तर ते पोलिसांना व्यवस्थित समजावून सांगणे गरजेचे आहे.
  • पोलिसांनी अनधिकृतपणे पैशांची मागणी केली तर ते पूर्ण करू नका.चुकूनही पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न करू नका.
  • जेव्हा पोलिसांची गाडी पकडतो तेव्हा त्यांचा बक्कल नंबर व नाव नोंद करून ठेवा.
  • तुमची गाडी जर एखाद्या पोलिस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या पेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अडवली तर तुम्ही त्यांच्यासोबत तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दंड भरून चुकी बाबतीत तडजोड करूशकता.
  • महत्त्वाचे म्हणजे तुमची गाडी लायसन्स किंवा परवाना नसताना चालवत असाल तर संबंधित वाहतूक पोलिस तुमची  गाडी ताब्यात घेऊ शकतात त्यासोबतच गाडी नोंदणीकृत नसेल तर ती जप्त देखील करू शकतात.
  • तुम्ही गाडीत बसला आहात अशावेळी पोलीस तुमची गाडी टोकरु शकत नाही.
  • तुमच्या गाडीमध्ये कोणी बसलेले नसेल तर त्यांना ती उचलून नेण्याचा अधिकार आहे.
  • जर तुमची गाडी एखाद्यावेळी एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केली तर तुम्हाला पुढील चोवीस तासात न्यायालयात चौकशीसाठी हजर राहणे बंधनकारक आहे.
  • वाहतूक पोलिसांनी तुम्हाला काही त्रास दिल्यास तुम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात.
English Summary: important traffic rules and your crucial right to about traffic rules and traffic police
Published on: 17 March 2022, 01:19 IST