Others News

एसबीआय (State Bank Of India) ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, या बँकेच्या ग्राहकांसाठी नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर (SBI Twitter Handle) अकाउंट वरून आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. एसबीआयने आपल्या ट्विटरवर ट्विट करत ग्राहकांना पॅन कार्ड ला आधार कार्ड सोबत लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयची बँकिंग सेवा (Banking services) वापरण्यासाठी ग्राहकांना लवकरात लवकर पॅन कार्ड (PAN card) आधार सोबत लिंक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकेने सांगितले की, कुठल्याही अडथळ्याविना एसबीआय ची बँकिंग सेवा उपभोगण्यासाठी ग्राहकांना लवकरात लवकर पॅन कार्ड आधार (Aadhar Card) सोबत लिंक करावे लागणार आहे.

Updated on 09 February, 2022 11:12 PM IST

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाने पॅन कार्ड आधार सोबत लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंतचा अवधी दिला आहे. जर नागरिकांनी 31 मार्च पर्यंत पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले नाही तर त्या संबंधित व्यक्तीचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे. तसेच एसबीआय खाते धारकांनी पॅन कार्ड आधार सोबत नाही केले नाही तर त्यांचे खाते त्यांना वापरता येणार नाही. पॅन कार्ड ला आधार कार्ड जोडण्यासाठी शासनाने 31 सप्टेंबर 2021 पर्यंतच अवधी दिली होती. परंतु असे असले तरी अनेक लोकांनी 31 सप्टेंबर पर्यंत पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले नव्हते म्हणून शासनाने परत एकदा यात मुदत वाढ करत 31 मार्च 2022 ही पॅन कार्ड आधार सोबत लिंक करण्यासाठी शेवटची तारीख जाहीर केली आहे.

Pan Card आधार सोबत लिंक करण्याची प्रोसेस 

पॅन कार्ड आधार सोबत लिंक करण्यासाठी आपणास सर्वप्रथम आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाताच आपणास होम पेजवर आधार लिंकिंगचा पर्याय दिसेल. आधार लिंकिंग च्या पर्यायावर जाताच एक नवीन पेज ओपन होणार आहे तिथे आपणास आपला बारा अंकी आधार कार्ड क्रमांक तसेच पॅन कार्डचा क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. 

त्यानंतर आधार कार्ड मध्ये जे नाव आहे ते नाव तिथे प्रविष्ट करावे लागेल तसेच आपला रजिस्टर मोबाईल नंबर देखील त्याठिकाणी भरणे अनिवार्य असणार आहे. जर आपल्या कडे असलेल्या आधार मध्ये केवळ जन्म वर्षे नमुद केलेले असेल म्हणजे संपूर्ण जन्मतारीख सर आपल्या आधार वरती नमूद केलेली नसेल तर आपणास I Have Only Birth Year या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 

एवढे केल्यानंतर त्याच्याखाली Agree To Validate नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. आणि मग तुम्ही भरलेली सर्व माहिती व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा करा, माहिती व्यवस्थित वाचून झाल्यानंतर आधार या पर्यायावर क्लिक करा तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केले जाईल.

English Summary: Important News | SBI account holders should do 'this' work on time otherwise ..
Published on: 09 February 2022, 11:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)