वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि.०३ ते ०५ जुन दरम्यान कोरडे हवामान राहण्याची व आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि.०६ व ०७ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत स्वरूपाच्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. ०८ ते १६ जुन दरम्यान सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता आहे.कृषी सल्लावरील हवामान अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, वाणांची वैशिष्ट्ये व बाजारपेठेतील उपलब्धता इ. बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
कृषी सल्ला वरील हवामान अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, वाणांची वैशिष्ट्ये व बाजारपेठेतील उपलब्धता इ. बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची व जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. विजांच्या पुर्वसुचनेसाठी व जीवितहानी टाळण्यासाठी "दामिनी" या मोबाईल ॲपचा वापर करावा.कोंबड्यांच्या व जनावरांच्या शेडच्या सभोवताली पावसाचे पाणी साचू नये म्हणून शेडच्या सभोवताली चर खोदावेत.
पाच दिवसीय हवामान अंदाज व कृषी सल्ला भारतीय हवामान खात्याने काल वर्तवलेल्या वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि.०३ ते ०५ जुन दरम्यान कोरडे हवामान राहण्याची व आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि.०६ व ०७ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत स्वरूपाच्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. ०८ ते १६ जुन दरम्यान सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता आहे.
Published on: 04 June 2022, 11:47 IST