Others News

बऱ्याचदा शिक्षण कमी असल्याने नोकरी आणि व्यवसाय यात समस्या निर्माण होतात. परंतु तुमचे शिक्षण जरी कमी असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत.या योजनांचा लाभ आठवी ते बारावी पास उमेदवार घेऊ शकतात

Updated on 20 December, 2021 10:24 AM IST

 बऱ्याचदा शिक्षण कमी असल्याने नोकरी आणि व्यवसाय यात समस्या निर्माण होतात. परंतु तुमचे शिक्षण जरी कमी असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत.या योजनांचा लाभ आठवी ते बारावी पास उमेदवार घेऊ शकतात

या योजनांच्या माध्यमातून तुम्ही नोकरी देखील करू शकता. या लेखात आपण अशाच काही उपयुक्त योजनांची माहिती घेऊ.

 कमी शिक्षण असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या काही उपयुक्त योजना….

  • मनरेगा योजना- या योजनेच्या माध्यमातून प्रती कुटुंब प्रती वर्षी शंभर दिवसांचा किंवा रोजगार दिला जाण्याची गॅरंटी असते.या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केल्यास पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला काम मिळण्याचा अधिकार मिळतो.
  • पीएम कौशल्य विकास योजना- केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना कौशल्य विकासाची ट्रेनिंग दिले जाते. या कौशल्य विकास ट्रेनिंग च्या माध्यमातून तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणाची संबंधित व्यवसाय सुरू करू शकता किंवा त्याच्याशी संबंधित रोजगार मिळू शकतात.
  • पीएम रोजगार सृजन कार्यक्रम- या योजनेच्या माध्यमातून निर्माण क्षेत्रात स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून दहा लाख रुपये आणि व्यापारी सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी महत्त्वाच्या आठ म्हणजे उमेदवार कमीत कमी आठवी उत्तीर्ण असायला हवा.
  • दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना- या योजनेचा प्रमुख उद्देश आहे की ग्रामीण भागातील युवकांना विविध क्षेत्रातील कौशल्यात शिक्षण देऊन त्यांना पारंगत करणे आणि स्वयंरोजगारासाठी तयार करणे हे होय
  • पीएम स्वनिधी योजना- या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
English Summary: important central goverment scheme for 8th passed student for employment
Published on: 20 December 2021, 10:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)