Others News

भारतात पॅन कार्ड एक अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे याची गरज ही बँकिंग कामात अधिक पडते. याच्या शिवाय अनेक बँकिंग कामे रखडून जातात. पॅन कार्ड बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी तसेच डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी, इ-केवायसी करण्यासाठी तसेच, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड प्राप्त करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट आहे. पॅन कार्ड हे एक ओळखपत्र म्हणून देखील काम करते. पॅन कार्ड हे टॅक्स भरण्यासाठी तसेच यासारख्याच अनेक महत्त्वाच्या वित्तीय कामासाठी वापरले जाते. जर आपल्याकडे हे महत्वाचे डॉक्यूमेंट नसेल किंवा हरवले असेल, किंवा चोरीला केली असेल तर चिंता करू नका आत्ता पॅन कार्ड बनवणे अजूनच सोपे झाले आहे.

Updated on 19 December, 2021 8:46 PM IST

आता पॅन कार्ड बनवण्यासाठी लांबच लांब रांगा मध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही. आता घरबसल्या हो खर ऐकताय तुम्ही अगदी घरबसल्या अवघ्या दहा मिनिटात पॅन कार्ड प्राप्त केले जाऊ शकते. आता भारत सरकारचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ई-फायलिंग या पोर्टलवर एक नवी सेवा सुरू केली आहे, याद्वारे केवळ आधार नंबर मार्फत पॅनकार्ड प्राप्त केले जाऊ शकते.

पण मात्र पॅन कार्ड काढण्यासाठी काही शर्ती व नियम यांची पूर्तता करणे आवश्यक असते, त्या शर्ती अशा आहेत की, आवेदन करणाऱ्या व्यक्तीने याआधी कधीही पॅन कार्ड काढलेले नसावे. आवेदन करणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. तसेच त्या व्यक्तीच्या आधार कार्डवर त्याची पूर्ण जन्मतारीख नमूद केली असणे आवश्यक आहे. तसेच पॅनकार्डसाठी आवेदन करताना तो व्यक्ती बालिग असावा.

आता पॅन कार्ड कसे डाउनलोड करणार हे जाणून घ्या

मित्रांनो आपण जे पॅन कार्ड डाउनलोड करणार त्याला इन्स्टंट पॅन कार्ड म्हणून ओळखले जाते. हे पॅन कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम www.Incometax.Gov.In या भारत सरकारच्या ऑफिसिअल वेबसाइटला भेट द्या.

वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे आपणांस 'इन्स्टंट ई-पॅन' हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावे लागेल.

त्यानंतर 'Get New E-PAN' या पर्यायावर  क्लिक करा.

यानंतर आपणांस आपला बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.

त्यानंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल हा ओटीपी दिलेल्या रकाण्यात प्रविष्ट करावा लागेल.

त्यानंतर आधारची माहिती सत्यापित करावी लागेल. यानंतर तुमचा ई-मेल आयडी सत्यापित करावे लागेल एवढे झाल्यानंतर आपणांस ई-पॅन डाउनलोड करता येईल.

English Summary: if your pancard is lossed then dont worry
Published on: 19 December 2021, 08:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)