जनधन खात्यांच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्य लोकांना बँकिंग क्षेत्राच्या प्रवाहात आणले. सरकारच्या वतीने या खात्याद्वारे बर्याच प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. परंतु या सगळ्या सुविधांपैकी जर तुम्हाला विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे खाते आधारशी जोडण्याची आवश्यकता असते.
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केली नसेल तर तुम्हाला 1.3 लाखाचे नुकसान होऊ शकते.ज्यांची जनधन खाते बँकेत आहे अशा ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात आले आहे. ज्यामध्ये एक लाखाचा अपघात विमा दिला जातो. जर तुम्ही तुमचे बँक खाते आधार लिंक केली नसेल तर तुम्हाला हा फायदा मिळणार नाही. तसे या खात्यावर तुम्हाला रुपये तीस हजाराचा अपघाती मृत्यू विमा कव्हर मिळते.
बँक खाते आधार शी कसे लिंक करावे?
तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुमच्या खात्यात आधार लिंक करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमच्या बँक पासबुक फोटो द्यावा लागतो.मेसेजच्या माध्यमातून ही तुमच्या खात्याला आदर्श लिंक करू शकता. बऱ्याच बँकांनी ही सुविधा सुरू केली आहे. तू जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुम्ही बँकेत नोंदणी असलेल्या मोबाईल नंबर वरून UID SPACE आधार नंबर SPACE खाते क्रमांक त्याची टाईप करून 567676 या क्रमांकावर मेसेज पाठवू शकतात.
त्यानंतर आपले बँक खाते आधार लिंक केले जाते. याशिवाय तुमच्या बँक खात्याला तुम्ही एटीएम मधूनही आधारशी लिंक करू शकता.
Published on: 13 April 2021, 09:17 IST