यावर्षी कडाक्याच्या उन्हाळ्याचा अनुभव सर्वांनी घेतला. आता कुठे थोडाफार हवेत गारवा आल्याने दिलासा मिळाला आहे.
अंगाचा लाहीलाही करणारा उन्हाच्या तीव्र झळात माणूस अक्षरशः होरपळून निघतो. त्यामुळे या कडक उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी लोक विविध उपाय योजतात. जेणेकरून या कडक उष्णतेपासून थोडातरी आराम मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो.
बरेच जण घरांमध्ये एयर कंडीशनर आणि कुलर यांचा उपयोग बहुतांशी करतात. परंतु त्यामध्ये देखील विजेच्या लपंडावामुळे हवा तेवढा आराम मिळू शकत नाही.
परंतु यावर एक नामी उपाय आला आहे, तो म्हणजे एक विशिष्ट प्रकारची बेडशीट बाजारात आली असून तिचा वापर तुम्ही जर उन्हाळ्यात केला तर तुम्हाला याचा अनुभव घेता येईल. या लेखामध्ये आपण या अनोख्या बेडशीट बद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:आला आला पाऊस आला!मान्सूनची मुंबईत एन्ट्री, पाच दिवसात राज्यभर पाऊस धारा
या कूलिंग जेल बेडशीट ची वैशिष्ट्ये
या अप्रतिम बेडशीट मध्ये कोणत्याही प्रकारचे पंखे नाहीत तसेच यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे कंपन मशीन दिले गेले नाही जे याला थंड ठेवते परंतु यामध्ये एक कूलिंग जेल वापरण्यात आला असून जे या बेड शीटला दीर्घकाळापर्यंत थंड ठेवते.
जेव्हा एखादी व्यक्ती त्यावर बसते किंवा झोपते तेव्हा ते त्याचे शरीर थंड करते. झोपताना ते व्यक्तीच्या शरीराला भरपूर विश्रांती देते.
या चादरीवर झोपल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो. या बेडशीट चे वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही प्रकारे खराब होण्याची कोणतीही चिंता नाही.
जर काही कारणास्तव ते खराब झाले असेल तर आपण ते कोरड्या कापडाने सहज स्वच्छ करू शकतो. परंतु हे लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत हे बेडशीट पाण्याने धुऊ नये. कारण जर असे केले तर त्यामध्ये असलेल्या जेल मधील थंडावा हळूहळू संपुष्टात येऊ लागतो.
तुम्हालाही बेडशीट खरेदी करायची असेल तर अशा प्रकारे करू शकता
तुम्हाला देखील उन्हाळ्यात थंडीची अनुभूती घ्यायची असेल तर आजही कूलिंग जेल मॅट्रेस तुमच्या घरी तुम्ही आणू शकतात.तुम्ही ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकतात.
यासाठी तुम्हाला फक्त ॲमेझॉन च्या साईटवर जाऊन त्याच्या बेडशीट चे नाव लिहावे लागेल. जिथे त्याची किंमत फक्त 699 रुपयांपर्यंत आहे. ऑर्डर दिल्यानंतर दोन दिवसात हे बेडशीट तुमच्या घरी पोहोचेल.
नक्की वाचा:Technology: वाळलेली फुले आणि पाने वाढवतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, नवीन तंत्रज्ञान विकसित
Published on: 13 June 2022, 10:20 IST