Others News

आपल्याकडे एक चांगले घर असावे , असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.

Updated on 16 August, 2022 9:25 PM IST

आपल्याकडे एक चांगले घर असावे ,असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.त्यासाठी अनेकांना आर्थिक परिस्थिती कमजोर असताना बॅंकांकडून ‘होमलोन’घ्यावं लागतं.त्यानंतर या ‘होमलोन’चे हप्ते फेडता फेडताच अनेकांचं आयुष्य जातं. त्यात काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने ‘रेपो रेट’मध्ये वाढ केली.. त्यानंतर लगेच बँकांनीही आपल्या सर्व

प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत.अशा परिस्थितीत तुमच्यावरील ‘होम लोन’चा (Home loan) बोजाही वाढला गेला आहे… या वाढलेल्या व्याजदरामुळे अनेकांची रात्रीची झोप उडाली असेल.. मात्र, काळजी करु नका..कर्जाचं हे ओझं कमी कसं करता येईल,How can this burden of debt be reduced?याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

असा करा कमी ओझं.प्री-पेमेंट- तुमच्याकडे थोडेफार पैसे साचले असतील, तर तुम्ही बॅंकेला ‘प्री-पे’ (Pre-pay) करा. त्यामुळे तुमची मुद्दल रक्कम कमी होईल. त्यातून तुम्ही कर्जाचा कालावधी किंवा ‘ईएमआय’ कमी करू शकता. ‘फ्लोटिंग रेट होम लोन’ घेणार्‍या बँका किंवा ‘एनबीएफसी’ गृहकर्ज कर्जदाराकडून प्री-

पेमेंटसाठी कोणताही दंड आकारू शकत नाहीत.कर्जाचा कालावधी - कर्जाचा कालावधी 25 ते 30 वर्षे असल्यास, मासिक हप्ते कमी होतात व तुम्ही अधिक कर्ज घेऊ शकता. मात्र, तुम्ही 10-15 वर्षांचे कर्ज घेतल्यास कमी व्याज भरावे लागेल आणि तुमचे कर्ज लवकर संपेल.

डाउन पेमेंट - मालमत्तेच्या एकूण व्हॅल्यूएशनच्या 75-90 टक्क्यांपर्यंत बॅंका कर्ज देतात. तुम्ही 10-25 टक्के भरून घर खरेदी करू शकता. शक्यतो बचत असल्यास, कमीत कमी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा.लोन ट्रान्सफर - होमलोन घेतलेल्या बॅंकेपेक्षा दुसरी बँक आकर्षक व्याजदरात होमलोन देत असेल, तर

तुम्ही त्या बँकेत तुमचं होमलोन ‘ट्रान्सफर’ (Loan transfer) करू शकता. मात्र, हा शेवटचा पर्याय असावा, कारण बॅलेन्स ट्रान्सफर करताना, तुमच्याकडून पुन्हा एकदा ‘प्रोसेसिंग फी’ (Proccesing Fee ) घेतली जाते.

‘ईएमआय’ जास्त ठेवा - पगारात वाढ झाल्यानंतर तुमची जास्त ‘ईएमआय’ (EMI) भरण्याची क्षमता असेल, तर तुम्ही तो वाढवू शकता.. त्याद्वारे तुम्हाला कर्जाचा कालावधी कमी करता येईल.. गृहकर्जाचा कालावधी कमी केल्यास, कर्जाची एकूण किंमत कमी होईल.

English Summary: If you want to finish the home loan quickly, then just read these tips, you will save money.
Published on: 16 August 2022, 09:25 IST