तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक उत्तम पर्याय आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत सामील होऊ शकता आणि दर महिन्याला भरपूर कमाई करू शकता.
बँका बँकिंग सेवा पुरविण्यासोबतच, सामान्य लोकांना त्यांच्याशी जोडून कमाई करण्याची चांगली संधी उपलब्ध करून देतात. तुम्हाला कोणत्याही सरकारी बँकेत जॉईन होऊन पैसे कमवायचे असतील तर तुम्ही यासाठी बँक मित्र बनू शकता.
देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँक मित्रासाठी अर्ज मागवते. बँक मिंत्रा बनून तुम्ही अनेक प्रकारे कमवू शकता. यासाठी बँक मित्राला कोणत्याही व्यक्तीचे खाते उघडण्यासाठी, त्याचे क्रेडिट कार्ड आणि बिल भरण्यासाठी खूप चांगले कमिशन मिळते.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत सर्व बँक मित्रांना 1.25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. बँक मित्राला दरमहा 2000 ते 5000 रुपये दिले जातात. बँक मित्र बनल्यानंतर तुम्हाला सरकारसोबत काम करावे लागेल.
यासाठी आवश्यक कागदपत्रे
यासाठी ओळखीचा पुरावा लागेल, पुराव्यासाठी पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्राची प्रत आवश्यक असेल.
दहावीचे गुणपत्रिका आणि चारित्र्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
याशिवाय काम सुरू करण्यासाठी वीजबिल, टेलिफोन बिल, रेशनकार्ड आदी कागदपत्रे असतील.
बँकेच्या पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला चेक देखील आवश्यक असेल.
Published on: 04 June 2022, 09:20 IST