आपण बऱ्याचदा कुठल्याही गरजेपोटी लोन घेतो. तुम्ही जेव्हा लोन घेण्याचा विचार करतो तेव्हा आपला गोंधळ उडतो तो हा की, लोन तर घ्यायचे आहे परंतु बँकेकडून घ्यावे की एखाद्या फायनान्स कंपनी कडून हे लवकर समजत नाही.
कारण बऱ्याच जणांना यामधील फरक आणि इतर फायद्याच्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला याबाबतीत माहिती देणार आहोत की तुम्हाला बँक परवडते की फायनान्स कंपनी किंवा तुमच्यासाठी दोघांपैकी काय अधिक फायद्याचे राहील.
लोन घ्यावे परंतु बँकेकडून या फायनान्स कंपनी कडून
जर व्याजाचा हिशोब पकडला तर फायनान्स कंपनी ह्या बँकेच्या तुलनेने जास्त लवचिक असतात. ह्यातून एक बँक व्याजाचा दर ठरवण्यासाठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य देत नाही. परंतु फायनान्स कंपन्यांकडे याबाबतीत चांगले पर्याय उपलब्ध असून यामध्ये आपल्यालापरवडेल अशी निवड करता येते. तुम्ही बँकेकडून किंवा फायनान्स कंपनी या दोघांपैकी कोणाकडूनही लोन घेऊ शकतात. या दोघांमध्ये फारसे अंतर नसून बँक आणि फायनान्स कंपनी या दोघांचाही कर्ज देण्याची प्रक्रिया जवळजवळ सारखे आहे. परंतु यामध्ये फरक असा असतो की बँकेचे सगळी नियंत्रण हे रिझर्व बँक आणि रिझर्व बँकेच्या प्रोटोकॉल नुसार कार्य चालते. तसेच बँकेचे नियम आणि कायदे खूपच कडक असतात. परंतु या तुलनेत फायनान्स कंपन्यांची कार्यपद्धत ही कंपनी ऍक्टनुसार चालते आणि कायदे आणि नियम इत्यादींमध्ये बऱ्याच प्रकारची सवलत मिळते.
जर आपण पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर फायनान्स कंपनी कडून घेणे जास्त फायद्याचे मानले जाते. आता आपण समजून घेऊ की बँक लोन किंवा फायनान्स अथवा एनबीएफसी लोन यामधून फायदेशीर काय राहते.
बँक आणि फायनान्स कंपनी या पैकी काय राहील फायदेशीर?
फायनान्स कंपन्यांकडून बँकेच्या तुलनेत पटकन लोन मिळते. बँकेचे नियम हे आरबीआय च्या नियमानुसार चालतात. त्यामुळे बँकेकडून लोन घेताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते व त्यामुळे बराच प्रकारचा वेळ वाया जातो. आज काल तुम्ही विचार केला तर यूपीआय पेमेंट ॲप द्वारे देखील पटकन लोन मिळून जाते. अशाच प्रकारे फायनान्स कंपन्यांकडून देखील दावा केला जाते की अगदी पाच मिनिटाच्या आत मध्ये लोन दिले जाईल. यालाच इन्स्टंट लोन असेदेखील म्हणतात. जर तुमची केवायसी योग्य राहिली तर काही मिनिटांमध्ये तुमच्या अकाउंट मध्ये लोनचे पैसे ट्रान्सफर केले जातात. जर तुम्ही pre-approved कस्टमर असाल तर लोन मिळण्यासाठी जास्त वेळ न लागता अगदी कमी वेळेत ते उपलब्ध होते. त्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज राहत नाही. त्यातुलनेत बँकेकडून लोनची प्रोसेस होण्यासाठी एक ते दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. व्याजाचे दर निर्धारित करण्यासाठी बँक ग्राहकांना जास्त स्वातंत्र्य देत नाही परंतु फायनान्स कंपन्या बऱ्याच प्रकारची सूट व सवलत दिली जाते.

बँकांना रिझर्व बॅंकेने सांगितलेल्या बेंचमार्क नुसार फ्लोटिंग रेट ठरवावा लागतो. तसेच बँका या आपल्या इंटरनल बेंच्मारक नुसार व्याजदर यांवर नियंत्रण ठेवतात आणि स्वतःच्या फायद्या नुसार व्याज घेतात. जर तुम्ही व्याजदर तसेच प्रोसेसिंग फी आणि पार्ट पेमेंट चार्ज यांचा विचार केला तर फायनान्स कंपन्यांकडून लोन घेणे अधिक फायद्याचे असते.
नक्की वाचा:चिंताजनक : महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता
तसेच लोन घेण्यासाठी जी पात्रता आणि योग्यता लागते यामध्ये देखील फायनान्स कंपन्या ग्राहकांना भरपूर सूट देतात. परंतु त्या तुलनेत बँक या आरबीआयने दिलेल्या पॅरामीटर्स आणि अटी यांच्यानुसार पात्रता ठरवतात. त्यामुळे अशा मध्ये जास्त सूट देता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी जर पूर्ण अटींचे पालन केले नाही तर लोन मंजूर होत नाही. अश्यात
सगळ्यात मोठी अडचण आहे क्रेडिट स्कोरची ठरते. कुठलीही बँक साडेसातशे क्रेडिट स्कोर च्या खाली कोणालाही लोन देत नाही. परंतु त्या तुलनेत फायनान्स कंपन्यांनी क्रेडिट स्कोर चा लिमिट हा फक्त सातशे असा ठेवला आहे. याचा अर्थ तुमचा क्रेडिट स्कोर कमी जरी असला तरी फायनान्स कंपन्या तुम्हाला लोन देतात परंतु अशा परिस्थितीत बँक लोन देत नाही.
कर्ज घ्या परंतु सांभाळून
या सगळ्या गोष्टींच्या मध्ये लोन घेणे किंवा नाही घेणे हा निर्णय तुमचा आहे. लोन घेताना बँक आणि फायनान्स कंपनी यांच्या अटी व्यवस्थित वाचाव्यात, व्याजदराचा व्यवस्थित हिशोब करावा तसेच बँक आणि फायनान्स कंपनी या दोन्हींचा नफा, नुकसान समजून घ्यावे. तरच लोन साठी एप्लीकेशन करावे. आजकाल ऑनलाईन ॲप्लिकेशन चे युग आलेले आहे. यामध्ये बँक आणि फायनान्स कंपन्या भागीदारीत काम करतात. परंतु फायनान्स कंपनी कडून लोन घेताना कुठल्याही बनावट कंपनीच्या जाळ्यात अडकू नये. काळजी घ्यावी.
Published on: 13 April 2022, 07:56 IST