बर्याचदा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जीवितहानी होते. अशा प्रकारची गॅस सिलेंडर स्फोटची घटना जर घडली तर इंधन कंपन्यांकडून विमा दिला जातो. इंधन कंपन्यांकडून सिलेंडर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सर्वोच्च मानके पूर्ण करण्यावर भर दिला जातो.
एलपीजी गॅस विमा पॉलिसी ही सामूहिक विमा सारखी आहे.हा विमा सर्व इंधन कंपनी घेतात. भारतामध्ये असलेल्या सर्व गॅस डीलर कडून देखील ग्रुप इन्शुरन्स घेतला जातो. त्यामुळे हे सर्व एलपीजी ग्राहकांना लागू होते. परंतु अजूनही बहुतांश लोकांना या बाबतची कसलीच माहिती नाही. त्यामुळे अशी दुर्घटना घडल्यानंतर बऱ्याच लोकांकडून विमा दावा केला जात नाही.
अशी दुर्घटना घडल्यास विम्याचा दावा कसा कराल?
- अशी दुर्घटना घडल्यानंतर लवकरात लवकर गॅस डिस्ट्रीब्यूटर ला शक्य तेवढ्या लवकर लिखित स्वरूपात माहिती द्यावी.
- त्यानंतर संबंधित गॅस डिस्ट्रीब्यूटरने संबंधित इंधन कंपनी, विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे.
- गॅस सिलेंडर स्फोटामुळे झालेल्या दुर्घटनेवर विम्याचा दावा करणाऱ्या पिडीत कुटुंबाला विमा दावा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित इंधन कंपनीग्राहकांची आणि नातेवाईकांची पूर्णतः मदत करते.
- एलपीजी डिस्ट्रीब्यूटर कडे एलपीजी अपघातातील नुकसानभरपाईसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे.
- सरकारी तेल कंपन्यांनी सर्व नोंदणीकृत एलपीजी ग्राहकांना विमा संरक्षण दिले आहे.
- नुकसान भरपाई बद्दल अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा जवळच्या शाखेची अथवा कार्यालयाशी संपर्क साधा.
(संदर्भ-abpमाझा)
Published on: 10 January 2022, 11:03 IST