बँकेच्या खात्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये काही खात्यांमध्ये कमीत कमी बॅलन्स असणे आवश्यक असते नाहीतर बँकेकडून दंड आकारला जातो. परंतु अशी ही काही खाती आहेत ज्यामध्ये कमीकमी बॅलन्स रकमेची आवश्यकता नसते.
त्यापैकीच हे खाते आहे ते म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून उघडण्यात आलेली खाते हे होय. जनधन योजनेचे खात्याच्या माध्यमातून आणि प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत.त्या म्हणजे खात्यांतर्गत एक्सीडेंटल इन्शुरन्स, चेक बुक आणि ओव्हरड्राफ्ट सारख्या अनेक सुविधा सुविधा देण्यात आल्या आहेत.याअंतर्गत तुम्हाला दहा हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुद्धा मिळतो. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
जनधन खाते अंतर्गत दहा हजार रुपये कसे मिळवायचे?
या योजनेअंतर्गत तुमच्या जनधन खात्यात झिरो बॅलन्स असला तरीही दहा हजार रुपये पर्यंतचा ओवरड्राफ्ट ची सुविधा उपलब्ध आहे. जसे आपण शॉर्टटर्म लोन घेतो त्यासारखीही सुविधा आहे. या खात्यातील ओव्हर ड्राफ्ट सुविधेसाठी वयाची मर्यादा ही जास्तीत जास्त पाच वर्षे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जनधन खाते हे किमान सहा महिने जुनेअसावे.नसल्यास फक्त 2000 चा ओवरड्राफ्ट उपलब्ध असतो.
जनधन खाता च्या माध्यमातून मनी ट्रान्सफर,लोन, इन्शुरन्स आणि पेन्शन मध्ये प्रवेश सुनिश्चित करतो.हेखाते तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी च्या मार्फत आउट लेटवर उघडले जाऊ शकते. पंतप्रधान जनधन खाते हे झिरो बॅलन्स ठेऊन उघडली जातात.
( संदर्भ- हॅलो महाराष्ट्र)
Published on: 05 December 2021, 08:50 IST