Others News

सध्या ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण दिवसेंदिवस खूप प्रमाणात वाढत आहे.बऱ्याचदा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना असल्या तरअशा योजनांचा लाभ घेण्यासाठी असो कीसाध्या तुम्हालासिम कार्ड घ्यायचे असेल तरी सुद्धा आधार कार्ड लागते.

Updated on 17 May, 2022 11:34 AM IST

 सध्या ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण दिवसेंदिवस खूप प्रमाणात वाढत आहे.बऱ्याचदा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना असल्या तरअशा योजनांचा लाभ घेण्यासाठी असो कीसाध्या तुम्हालासिम कार्ड घ्यायचे असेल तरी सुद्धा आधार कार्ड लागते.

तसे पाहायला गेले तर आता बर्‍याच ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्डअनिवार्य करण्यात आली आहे.त्यामुळे आपणज्या ठिकाणी आधार आणि पॅन कार्डची झेरॉक्स लागतेअशा ठिकाणी आपणमनामध्ये कुठलाही संशय न ठेवता सहजपणेझेरॉक्स प्रतसंबंधितांकडे देतो.

परंतु या विश्वासाचा गैरफायदा घेऊनकोणीही तुमची फसवणूक करू शकतो त्यामुळे अलर्ट राहणे गरजेचे आहे.या झेरॉक्स प्रत  चा उपयोग करून कोणीही ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपनीकडून तुमच्या नावे परस्पर कर्ज देखील काढू शकतो. असाच एक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर येथे उघडकीस आला आहे. याठिकाणी एका  इसमानेएक नव्हे,दोन नव्हे तर तब्बल 37 लोकांच्या नावावर कर्ज उचलले आहे.

 आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी की नाही खरंच ही विचार करण्याची वेळ(Zerox Of Adhaar And Pan)

 कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा बर्‍याच प्रकारच्या तत्सम कामासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यातल्या त्यात तुम्ही कुठल्याही सीएससी केंद्रात जाऊन ही संबंधीची कामे ऑनलाइन पद्धतीने करतात. त्यामुळे आता या केंद्र चालकांना आपल्या आधार व पॅन कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी का याचा विचार करण्याची वेळ आली असून कारण आता या झेरॉक्स प्रतीच्या माध्यमातूनच व्यक्तींची फसवणूक होऊ शकत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आता ऑनलाईन पद्धतीने कर्ज देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. अशा कंपन्यांनी काही मोबाईल ॲप विकसित केले असून या ॲप्सच्या माध्यमातून केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड प्रत अपलोड केल्यानंतर लगेच पाच हजारापासून सात लाख रुपयांपर्यंत कर्ज वितरित करण्यात येते.

तसेच काही कंपन्या क्रेडिट कार्ड देऊन यामध्ये रक्कम क्रेडिट करतात व याचा फायदा काही भामटे घेत आहे. व्यक्तींनी इतर कामांसाठी दिलेले पॅन व आधार कार्डची झेरॉक्स प्रती अशा कंपन्यांसाठी वापरून त्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलण्याचे प्रकार घडत आहेत.

 या पद्धतीने फसवणूक कशी होऊ शकते? नागरिकविश्वासाने एखाद्याला विविध कामांसाठी कागदपत्र देतात. परंतु अशी फसवणूक करणारे लोक ॲप वर कागदपत्र अपलोड करतात. ओटीपी साठी कागदपत्र असलेल्या व्यक्तीच्या नावे मोबाईलचे सिम कार्ड खरेदी  केले जाते. त्यावरचा ओटीपी टाकून कर्ज किंवा क्रेडिट मिळाल्यावर सिमकार्ड नष्ट केली जाते.

काही प्रकरणात तर असे फसवणूक करणारे लोक कागदपत्र असलेल्या व्यक्तीलाच योजनेसाठी आहे असे सांगून ओटीपी विचारून फसवणूक करतात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:एकदा लागवड करा 25 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळवा! मे- जून महिन्यात करा लागवड, एका एकरात वर्षात कमवा 10 लाख उत्पन्न

नक्की वाचा:माहिती गरजेची! गावठाण विस्तार म्हणजे नेमके काय? वाचा आणि जाणून घ्या

नक्की वाचा:Superb Bussiness Idea: गल्लीगल्लीत आणि कुठल्याही हंगामात अगदी चांगल्या पद्धतीने चालणारा हा व्यवसाय करून कमवा चांगला नफा

English Summary: if you give your aadhar and pan card xerox print to anyone so take precaution
Published on: 17 May 2022, 11:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)