Others News

बऱ्याच जणांच्या मनामध्ये एखादा व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा असते. परंतु कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते.

Updated on 18 March, 2022 9:45 AM IST

बऱ्याच जणांच्या मनामध्ये एखादा व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा असते. परंतु कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते.

त्यामुळे बरेच जण व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांची मदत घेतात. परंतु प्रत्येक बँकांचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्याला कुठली बँक स्वस्त कर्ज देते हे माहीत असणे खूप गरजेचे असते. कारण तुमची व्यवसायाची कल्पना कितीही चांगली असली तरी तिला पैशांची गरज लागते. त्यामुळे तुम्हाला परवडेल अशा दरात कुठल्या बँक कर्ज देतात याची माहिती असणे फार गरजेचे आहे. या लेखात आपण अशाच काही बँकांची माहिती घेऊ.

 या आहेत व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बँक

1- स्टेट बँक ऑफ इंडिया- एसबीआय ही देशातील सर्वात मोठे सार्वजनिक बँक आहे. ही बँक अतिशय कमी व्याजदरात व्यवसाय कर्ज देत आहे. बँक पन्नास लाख ते 1 कोटी पर्यंतच्या रकमेसाठी 11.2 टक्के व्याज दराने कर्ज देत आहे. परंतु यामध्ये बँक दोन ते तीन टक्के प्रोसेसिंग फी देखिल आकारते. हे  कर्ज बँकेकडून पाच वर्षाच्या कालावधी करिता दिले जाते.

नक्की वाचा-Pm Kisan GoI Mobile App च्यामदतीने मिळेल तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्याविषयी अचूक माहिती, वाचा सविस्तर माहिती

2- एचडीएफसी बँक- एक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून या बँकेने देखील परवडतील अशा दरात कर्ज देऊ केले आहे. मार्चमध्ये बँकेकडून 16 टक्के दराने कर्ज दिले जात आहे. या देण्यातयेणाऱ्या कर्जावर बँकेकडून 499 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जात आहे. ही बँक सहा 48 महिन्यांकरिता 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे.

3- ॲक्सिस बँक- ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून 15 टक्के प्रास्ताविक दराने व्यवसाय कर्ज देत आहे. या बँकेकडून व्यवसाय उभारणीसाठी पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. याचा कालावधी हा 12 महिने ते 36 महिन्यांकरिता असू शकतो.

परंतु तुमचा व्यवसायाच्या प्रकारानुसार व कर्जाची रक्कम किती आहे यावर  या बँकेचे व्याजदर अवलंबून आहेत.

नक्की वाचा-भाजीपाला, फळे विक्री व्यवसायत मिळू शकते कमी भांडवलात चांगले उत्पन्न

4- आय सी आय सी आय बँक- ही बँक देखील सोळा टक्के प्रस्तावित दाराने व्यवसाय कर्ज देत आहे. जर तुमची व्यवसायाची कल्पना चांगली असेल तर तुम्ही बँकेकडून 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज येऊ शकतात. त्याचा परत खेड कालावधी 6 ते 48 महिन्यांपर्यंत असेल.( स्त्रोत- हॅलो महाराष्ट्र )

English Summary: if you get loan for bussiness this some bank give you chipest intrest rate loan
Published on: 18 March 2022, 09:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)