Others News

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कमी हफ्त्यात अधिक परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पॉलिसीचा उत्तम पर्याय आहे.

Updated on 03 February, 2022 9:45 AM IST

नवी दिल्ली : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कमी हफ्त्यात अधिक परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पॉलिसीचा उत्तम पर्याय आहे. तुम्ही गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय म्हणून एलआयसी (LIC) विचार करत असल्यास तुमच्यासाठी बातमी महत्वाची आहे. भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाने (LIC) महत्वाच्या दोन विमा पॉलिसीत सुधारणा केल्या आहेत.

सरकारने एअर इंडियाचे खाजगीकरण केले असून एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. चालू आर्थिक वर्षात सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमाचे यश हे एलआयसीच्या आयपीओवर अवलंबून आहे. 31 मार्चपूर्वी एलआयसी शेअर बाजारात लिस्टेड होण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल.

एलआयसीमधील 5 टक्के हिस्सा विकून सरकार सुरुवातीला 65,000 ते 75,000 कोटी रुपये उभे करू शकते. हे चालू आर्थिक वर्षासाठी 78,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करेल असा सरकारला विश्वास आहे. आतापर्यंत या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून सरकार फक्त 12,000 कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त उभे करू शकले आहे.

जीवन शांतीच्या दोन्ही अ‍ॅन्युटी पर्याय अंतर्गत अ‍ॅन्युटी रकमेची गणना एलआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध कॅलक्युलेटरच्या सहाय्याने केली जाऊ शकते. विमा पॉलिसी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहेत. तुम्ही एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पॉलिसी खरेदी करू शकतात.

English Summary: If you are investing in LIC, read this news; Changes in LIC's policy, know the revised criteria
Published on: 03 February 2022, 09:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)