सध्या देशात महागाईचा चाबूक मध्यमवर्गीय कुटुंबावर चांगलाच बरसत आहे, आणि म्हणुन मध्यमवर्गीय कुटुंब आर्थिक टंचाईचा सामना करताना दिसत आहे. आणि तुटपुंजी पगारात आपले आयुष्य कसेबसे रेटत आहे. जर आपणही आर्थिक टंचाईचा सामना करत असाल आणि काहीतरी एक्सट्रा इनकम करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही आपल्या साठी एक उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे आपण लाखो रुपये सहजरीत्या कमवू शकता, मात्र यासाठी आपल्याकडे जुन्या आणि दुर्मिळ एक, पाच आणि दहाच्या नोटा असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे ह्या दुर्मिळ नोटा असतील तर आपण तब्बल एक लाख रुपयापर्यंत कमाई करू शकता. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल हे कसं काय शक्य आहे, चला तर मग वाचक मित्रांनो जाणुन घेऊया याविषयी सविस्तर.
- ऑनलाईन विक्री करू शकता जुन्या दुर्मिळ नोटा
अलीकडे बाजारात बंद पडलेल्या तसेच काही दुर्मिळ नोटाची मोठी मागणी बघायला मिळत आहे. या अशा दुर्मिळ नोटा आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विक्री करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमक्या कुठल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती याची विक्री केली जाऊ शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ऑनलाईन प्लॅटफॉर्म ebay आणि कॉइन बाजार या वेबसाईटवर या जुन्या दुर्मिळ नोटांची विक्री केली जाऊ शकते. या जुन्या नोटा विकताना आपण निगोसिएशन सुद्धा करू शकता, त्यामुळे आपणास या नोटांच्या बदल्यात चांगला मोबदला मिळू शकतो.
-
एक रुपयाच्या मोबदल्यात मिळणार पूर्ण 45 हजार रुपये
जर आपल्याकडे दुर्मिळ चलन बाहेर झालेली एक रुपयाची नोट असेल तर आपणास तब्बल 45 हजार रुपये मिळू शकतात. भारत सरकारने जरी या नोटा चलन बाह्य केल्या आहेत तरी काही शौकीन लोक या दुर्मिळ नोटांची खरेदी करतात, म्हणून या नोटांची मार्केटमध्ये चांगलीच डिमांड बनली आहे. आपणास एक रुपयाच्या नोटांच्या बदल्यात पूर्ण 45 हजार रुपये मिळू शकतात पण यासाठी एक रुपयाची नोट ची 1957 या वर्षाची पाहिजे शिवाय या नोटवर गव्हर्नर एच एम पटेल यांची स्वाक्षरी देखील पाहिजे.
- पाच रुपयाच्या मोबदल्यात मिळणार तीस हजार रुपये
जर आपल्याकडे जुने दुर्मिळ पाच रुपयाची नोट असेल तर आपणास तब्बल याच्या बदल्यात तीस हजार रुपये मिळू शकतात पण या नोटवरती ट्रॅक्टरची चित्र असायला हवे तसेच या नोटा वरती 786 हा नंबर देखील असायला हवा. जर आपल्याकडे अशी नोट असेल तर आपण ती कॉइन बाजार या साईट वरती विकू शकता.
- दहा रुपयाच्या नोटच्या मोबदल्यात मिळणार 25000 रुपये
जर आपल्याकडे 1947 या वर्षाची दहा रुपयाची नोट असेल तर आपणास पंचवीस हजार रुपये मिळतील, या 1947 वर्षातील दहा रुपयाच्या नोटेवर अशोक स्तंभ असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे अशी नोट असेल तर आपणास याच्या मोबदल्यात चक्क पंचवीस हजार रुपये मिळू शकतात. जर आपल्याकडेही अशी नोट असेल तर आपण तिला ऑनलाईन विक्री करू शकता.
Published on: 22 December 2021, 10:10 IST