देशात सर्वत्र सर्व बँकिंग कामे ऑनलाईन करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. आता जवळपास सर्वच ठिकाणी ऑनलाइन पेमेंटला लोक पसंती दर्शवीत आहेत.डिजिटल ट्रांजेक्शन हे तुलनेने सोपे असते तसेच यामुळे वेळ वाचतो म्हणून आता अनेकजण डिजिटल ट्रांजेक्शन करत असतात. डिजिटल ट्रांजेक्शनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी आपणास बँकेत प्रत्यक्षरीत्या जाण्याची आवश्यकता नसते. आपण अवघ्या काही मिनिटात घरबसल्या कुणालाही पैसे पाठवू शकतो किंवा कुणाकडनही पैसे प्राप्त करू शकतो. त्यामुळे देशात डिजिटल ट्रांजेक्शन चे चलन चांगलेच प्रचलित होत आहे. आता सर्वच ठिकाणी पैशांचा व्यवहार हा डिजिटली होत आहे, त्यामुळे पैशांच्या व्यवहारात पारदर्शकता आली आहे.
डिजिटल ट्रांजेक्शन मध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, यात नेट बँकिंग चा देखील समावेश असतो नेट बँकिंग करून अनेक प्रकारची ऑनलाईन कामे केली जातात. वस्तूंची खरेदी देखील आता ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग द्वारे केली जात आहे. नेट बँकिंग मध्ये फोन पे, गुगल पे, भीम यूपीआय या गोष्टींचा समावेश असतो. अलीकडे नेट बँकिंग करण्यासाठी बँकेच्या आयएफएससी कोडची देखील आवश्यकता भासत नाही.
नेट बँकिंग मुळे पैशाच्या व्यवहारात तत्परता तर आलीच आहे शिवाय यामुळे पारदर्शकता देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र या सुविधासोबतच डिजिटल ट्रांजेक्शन मुळे अनेकदा चुका देखील घडत असतात. ऑनलाइन पेमेंट करताना अथवा डिजिटल ट्रांजेक्शन करताना काही वेळेस चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले जातात, बँक अकाउंट चुकीचा प्रविष्ट केले गेल्यामुळे अनेकदा चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठविले जातात. तसेच काही वेळेस बँक अकाउंट नंबर व्यवस्थित असतो मात्र संबंधित व्यक्तीला जास्तीचे पैसे पाठवले जातात. त्यामुळे अशा वेळी नेमके काय करायचे आपले पैसे वापस कसे प्राप्त करायचे हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले गेले असता ते पैसे वापस कसे प्राप्त करायचे.
चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले असता करा हे काम
मित्रांनो जर आपल्याकडून ऑनलाइन ट्रांजेक्शन करताना चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले गेले असतील, तर सर्वात आधी या व्यवहाराची माहिती आपल्या बँकेला देणे अपरिहार्य ठरते. म्हणून पैशे चुकीच्या खात्यात टाकले गेले असतील तर सर्वात आधी याची माहिती आपल्या बँकेला द्या.आपण आपल्या बँकेच्या कस्टमर केअर ला फोन करून देखील या संबंधित माहिती देऊ शकता. कस्टमर केअरला फोन करताना चुकीच्या व्यवहाराची सर्व माहिती आपल्याजवळ असणे आवश्यक असते. ज्या खात्यात चुकीच्या पद्धतीने पैसे टाकले गेले आहेत त्या खात्याची सर्व डिटेल्स आपण आपल्याजवळ असू द्या आणि मग कस्टमर केअर ला कॉल करा.
मित्रांनो चुकीच्या खातात पैसे पाठवले गेले असतील तर या संदर्भात आपण एक लिखित स्वरूपाचा अर्ज देखील आपल्या बँकेत जमा करू शकता. तसेच आपल्याला ज्या बँक खात्यात पैसे पाठवले गेले आहेत त्या बँकमध्ये देखील एक लिखित स्वरूपाचा अर्ज करावा लागेल. मित्रांनो मात्र हे सर्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेवढ्या लवकर संबंधित बँकांना व्यवहाराचा तपशील द्याल तेवढ्याच लवकर आपले पैसे परत येतील.
Published on: 09 January 2022, 07:36 IST