मुंबई: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मात्र अजूनही मुहूर्त लागलेला नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या सुनावणीनंतरच तो करावा, असा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहेत.
ज्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस शिवसेनेनं केली होती, त्यापैकीच एक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी तेव्हाचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे ही शिफारस केली होती.
पण आमदारांना उत्तरासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं 12 जुलैपर्यंत त्यांना उत्तरासाठी वेळ दिला आणि त्याचमुळे एकप्रकारे सरकार स्थापनेचा मार्गही मोकळा झाला.
हे ही वाचा: दिलासादायक ! खाद्यतेल स्वस्त होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय
पाहा कसा असणार फॉर्म्युला?
शिंदे गटाला एकूण 12 ते 14 कॅबिनेट राज्यमंत्री पद मिळतील आणि भाजपाकडे उर्वरित मंत्रीपद असतील. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे नगरविकास खातं आणि सामान्य प्रशासन हे स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी खाती होती त्यातली बहुतेक खाती ही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा: 7th pay commission: कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 2 लाख रुपये दिले जाणार?
भाजपा कडे
गृह, वित्त नियोजन
महसूल
सार्वजनिक बांधकाम
उर्जा, जलसंपदा
गृहनिर्माण
विधी व न्याय सारख्या महत्वाची खाते ठेवण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडे
नगरविकास
सामान्य प्रशासन
एमएसआरडीसी
उद्योग
कृषी
शिक्षण
उच्च तंत्र शिक्षण
समाज कल्याण
जलसंधारण
पाणी पुरवठा
पर्यावरण यासह काही महत्वाची खाते असतील अशी शक्यता आहे.
हे ही वाचा: PM Kisan Yojana : कामाची बातमी.! 'या' तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे
Published on: 07 July 2022, 05:48 IST