PM Kisan Samman Nidhi Yojana) पीएम किसान सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. वर्षभरात तीनवेळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जातो. दरम्यान पीएम मोदी सरकार द्वारे साडेआठ लाख कोटी लाभार्थ्यांना सहावा हप्ता देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा हळूहळू टाकण्यात आला आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या लाभ घेण्यासाठी जमीन आपल्या नावावर असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी कोणते व्यक्ती पात्र आहेत,
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असावी, पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसेल. यासह जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट असेल तर तोही या योजनेस पात्र नसेल. यासह जर आपल्या या योजनेच्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन असणे आवश्क असते. जर शेत जमीन आजोबांच्या किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही.
पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या नियमानुसार, जर आपली शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे, पण आपण त्याचा उपयोग आपण दुसऱ्या गोष्टीसाठी करत आहात तर आपण या योजनेसाठी पात्र नाहीत. यासह जर आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर आपण या योजनेसाठी आपण अपात्र ठरणार. जर आपण करदाते असाल तर आपण यासाठी अपात्र ठरू शकता.
Published on: 20 August 2020, 06:13 IST