Others News

गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिनाभराआधीच सिलिंडरच्या किमतींनी एक हजार रुपायांचा आकडा पार केला होता. त्यानंतर आता थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यासह 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे.

Updated on 15 July, 2022 2:57 PM IST

गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिनाभराआधीच सिलिंडरच्या किमतींनी एक हजार रुपायांचा आकडा पार केला होता. त्यानंतर आता थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यासह 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहिले तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी केली आहे.

अशात उज्ज्वला योजनेच्या लाभधारकांना गॅसवर सबसिडी देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांच्या ही खात्यावर नाममात्र एलपीजी सबसिडी मिळते. परंतू, काही कारणाने ही सबसिडी बंद झाल्यास हे काम करा. सबसिडी तुमच्या खात्यात जमा होईल.

विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांना 1053 रुपयांना उपलब्ध आहे. तर कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये मिळत आहे. परंतु उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरसाठी फक्त 853 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या गरीब महिला लाभार्थ्यांना केंद्र सरकार अजूनही अनुदानाचा लाभ देत आहे. त्यांना सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा कमी दरात एलपीजी सिलिंडर दिला जातो.

एलपीजी गॅस सबसिडी अशी तपासा -
सर्व प्रथम www.mylpg.in ही वेबसाइट मोबाइल किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर उघडा.

स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल, येथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करू शकता.

स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल. हे तुमच्या गॅस सेवा प्रदात्याचे पृष्ठ आहे. आता वरच्या उजव्या बाजूला साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर क्लिक करा.

तुम्ही तुमचा आयडी येथे आधीच तयार केला असल्यास, साइन इन करा. जर तुम्ही अद्याप आयडी तयार केला नसेल, तर नवीन वापरकर्त्यावर क्लिक करून वेबसाइटवर लॉग इन करा.

Donald Trump wife: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन

पुढे तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये उजव्या बाजूला View Cylinder Booking History वर क्लिक करा. तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी देण्यात आली आहे हे येथे तुम्हाला कळेल.

जेंव्हा सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात यासोबतच जर तुम्ही गॅस बुक केला असेल आणि तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला फीडबॅक बटणावर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्ही सबसिडीचे पैसे न मिळाल्याबद्दल तक्रार देखील करू शकता 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

महत्वाच्या बातम्या
मक्याला मिळतोय MSP पेक्षा जास्त भाव; आता शेतकऱ्यांचे नशीब बदलणार, करा वेळीच पेरणी
Post Office Scheme; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; गुंतवा फक्त 50 रुपये आणि मिळवा तब्बल 50 लाख रुपये

English Summary: If LPG is not getting subsidy, do 'this' work immediately; Money will be credited to the account.
Published on: 15 July 2022, 02:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)