Others News

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात हिवाळा आणि पावसाळा पेक्षा अधिक वीज बिल येते. उन्हाळ्यातएसी फॅन फ्रिज यांसारखे उपकरणे अधिक उपयोगात आणले जात असल्याने वीज बिलात वाढ होणे अधिक असते. अनेक लोकांना उन्हाळ्यात वीजबिल हजारोंच्या घरात येतात त्यामुळे त्यांच्या खिशावर कात्री बसत असते. मध्यमवर्गीय लोकांना वीज बिलामुळे मोठा फटका बसत असतो, वीज बिलामुळे त्यांच्या घराचे आर्थिक बजेट कोलमडते. त्यामुळे आज आपण वीजबिल कशा पद्धतीने कमी केले जाऊ शकते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Updated on 10 March, 2022 4:59 PM IST

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात हिवाळा आणि पावसाळा पेक्षा अधिक वीज बिल येते. उन्हाळ्यातएसी फॅन फ्रिज यांसारखे उपकरणे अधिक उपयोगात आणले जात असल्याने वीज बिलात वाढ होणे अधिक असते. अनेक लोकांना उन्हाळ्यात वीजबिल हजारोंच्या घरात येतात त्यामुळे त्यांच्या खिशावर कात्री बसत असते. मध्यमवर्गीय लोकांना वीज बिलामुळे मोठा फटका बसत असतो, वीज बिलामुळे त्यांच्या घराचे आर्थिक बजेट कोलमडते. त्यामुळे आज आपण वीजबिल कशा पद्धतीने कमी केले जाऊ शकते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

असं सांगितलं जातं की, या ट्रिक्सचा वापर करून वीजबिलमध्ये 50 टक्क्यांची बचत केली जाऊ शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया विज बिल वाचवण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. मित्रांनो, जर आपणही अधिकचे विज बिल येते म्हणून चिंतेत असाल तर आपण वीज बिल कमी करण्यासाठी सोलर पॅनल चा उपयोग करू शकता. सोलर पॅनल बसवण्यासाठी एकदाच खर्च करावा लागतो मात्र, यापासून आयुष्यभर वीजनिर्मिती होत असते आणि त्यामुळे वीज बिलावर होणारा हजारोंचा खर्च कमी करता येतो. उन्हाचा वापर करून सोलर पॅनल सिस्टीम वीज निर्मिती करत असते, त्यामुळे याचा वापर करून वीजबिलात कटोती केली जाऊ शकते. याचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे आपल्याकडे बारामाही ऊन पडत असते त्यामुळे सोलर पॅनल बारामाही उपयोगात आणले जाऊ शकते. सोलर पॅनल आपल्या घरावर बसवण्यासाठी आपण सोलर पॅनल प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सीकडे याचा तपास करू शकता किंवा ऑनलाइन पद्धतीने आपल्या घरासाठी आवश्यक सोलर पॅनल इन्स्टॉल करून घेऊ शकता.

या व्यतिरिक्त आपण, आपल्या घरात प्रकाश साठी एलईडी ब्लब चा वापर करू शकता. यासाठी अगदी अत्यल्प विज लागत असते शिवाय एलईडी बल्ब प्रकाश देखील चांगला देत असतो. त्यामुळे साध्या बल्बपेक्षा एलईडी बल्ब वापरणे सोयीचे ठरणार आहे. तसेच मित्रांनो आपण जे इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतो ते खरेदी करताना विशेष लक्ष द्यायचे म्हणजेच नेहमी फाईव्हस्टार इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करायची यामुळे इलेक्ट्रिसिटी कमी प्रमाणात खर्च होत असते परिणामी वीज बिल कमी होऊ शकते. बल्ब आणि ट्यूबलाइट पेक्षा सीएफएल बल्प वापरणे अधिक फायद्याचे ठरते सीएफएल बल्प साठी कमी इलेक्ट्रिसिटी खर्च होत असल्याने आपण ट्यूबलाइट वापरण्याऐवजी सीएफएल बल्प वापरू शकता. या व्यतिरिक्त आपण ज्यावेळी आवश्यकता नसते अशा वेळी बंद करून ठेवू शकता. आवश्‍यकतेनुसार इलेक्ट्रिसिटी वापरल्याने वीजबिलात कपात केली जाऊ शकते. यामुळे विजेची बचत होणार आहे.

तसेच आपण उन्हाळ्यात एसी ऐवजी फॅनचा वापर करू शकता. एसीसाठी अधिक इलेक्ट्रिसिटी खर्च होते तर फॅनसाठी अगदी नगण्य एलेक्ट्रिसिटी खर्च होत असते.  या व्यतिरिक्त आपण फ्रिज नेहमी थंड जागेवर ठेवले पाहिजे यामुळे फ्रिज कमी इलेक्ट्रिसिटी खर्च करते. तसेच फ्रिजमध्ये अन्नपदार्थ ठेवताना अगदी गरम अन्नपदार्थ ठेवू नका त्याला आधी बाहेर थंड होऊ द्या त्यानंतर फ्रिज मध्ये ठेवा. या काही सोप्या ट्रिक्स वापरून आपण इलेक्ट्रिसिटी बचत करू शकता.

English Summary: if electricity bill is getting heavy then try this tricks and save electricity
Published on: 10 March 2022, 04:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)