Others News

आपण बऱ्याचदा वेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो व त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळते. ही गुंतवणूक करताना आपण स्वतःच्या नावावर करत असतो किंवा पत्नीच्या नावे देखील बरेचदा गुंतवणूक केली जाते.

Updated on 07 March, 2022 10:43 AM IST

आपण बऱ्याचदा वेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो व त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळते. ही गुंतवणूक करताना आपण स्वतःच्या नावावर करत असतो  किंवा पत्नीच्या नावे देखील बरेचदा गुंतवणूक केली जाते.

परंतु बऱ्याचदा होते असे की, अशा गुंतवणुकीच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळते त्यावर टॅक्स हा कोणत्या स्वरूपात आकारला जातो, हे देखील माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. जर इन्कम टॅक्स चे नियम पाहिले तर पतीने पत्नीच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केल्यास ती भेट म्हणून गणली जाईल. आयटीआर फार्मच्या शेडूलEI मध्ये पत्नीने  गुंतवणुकीची रक्कम मुक्त उत्पन्न म्हणून  उघड केली पाहिजे. उदाहरणार्थ पतीने पत्नीच्या नावाने सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक केली आहे तर व्याजाचे उत्पन्न त्याच्या आयटीआरच्या शेडूल एसपीआय मध्ये त्याच्या एकूण उत्पन्नात जोडले जाईल. परंतु पत्नीने इतके जमा केलेली उत्पन्न  उघड करणे आवश्यक नाही.

इतरांकडून मिळालेल्या कॅश गिफ्ट वरील टॅक्स

 इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 56 (2)(x) नुसार एखाद्या व्यक्तीला मिळालेली एकूण संपत्ती एका आर्थिक वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर टॅक्स द्यावा लागेल. अशा रकमेवर इतर स्त्रोतांकडून मिळकत म्हणून टॅक्स आकारला जातो. याविषयी बोलताना टॅक्स एक्सपर्ट बलवंत जैन म्हणतात की, एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक लोकांकडून मिळालेली एकूण रोख रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास अशा रकमेवर लागू स्लॅब दरानुसार टॅक्स आकारला जाईल. त्यामुळे टॅक्स टाळण्यासाठी एका आर्थिक वर्षात मिळालेल्या गिफ्टची एकूण रक्कम 50 हजार पेक्षा जास्त नसावी. 

या सोबतच इन्कम टॅक्स नियमानुसार नातेवाईकांकडून मिळालेल्या कॅश गिफ्ट संपूर्णपणे टॅक्स फ्री असतात. या नातेवाइकांमध्ये पती किंवा पत्नी, पती किंवा पत्नी चा भाऊ किंवा भावंडं किंवा बहीण यांचा समावेश असेल. (स्रोत-HELLO महाराष्ट्र )

English Summary: if do investment on wife than important to know about income tax return
Published on: 07 March 2022, 10:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)