संपत्ती विषयीचे वाद हे सर्वश्रुत आहेत. जर आपण कोर्टकचेऱ्या मधील प्रकरणे पाहिले तर बहुसंख्य वाद हे संपत्ती संबंधित असतात.
संपत्तीच्या बाबतीत अनेकदा खूप अवघड पेचप्रसंग निर्माण होतात अशी प्रकरणे न्यायालयात जातात. अशा अवघड प्रकरणांवर बऱ्याचदा न्यायालयाकडून आधारभूत ठरतील असे निकाल देण्यात आले आहेत. असाच एक महत्वपूर्ण आणि तितकाच अवघड वाटणारा निकाल दिल्ली सत्र न्यायालयाने दिला आहे.
दिल्ली सत्र न्यायालयाने दिलेला निकाल
एका प्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयाने निकाल दिला की जर मुलीचे निधन झाले तरी देखील तिचा पती आणि तिच्या मुलांचा हा वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यासंबंधीचे प्रकरण दिल्लीच्या साकेत न्यायालयात सुरू होते. या संदर्भात असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट टिप्पणी केली आहे.
नक्की वाचा:एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!
साकेत कोर्टाचे न्यायमूर्ती नरेश कुमार लाका यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
सदर प्रकरणांमध्ये एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिका नुसार त्याच्या दिवंगत आईच्या भावाने वडिलांच्या मालमत्ता मधील त्यांचा अधिकार नाकारला आहे. आईचे निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर पतीचा आणि मुलांचा अधिकार नसल्याचे सांगत भावानी याचिकाकर्त्यांना मालमत्ता हक्क नाकारला आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने म्हटले की, जरी मुलीचा मृत्यू झाला असेल तरी तिचा पती आणि तिची मुलं यांचा त्या मुलीच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार आहे.
नक्की वाचा:आता शेतकऱ्यांना मिळणार अनुदान स्वरूपात डिझेल? मशागत महागल्याने चर्चा सुरु..
त्यामुळे मुलीच्या वाटयाविषयी योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत सदर मालमत्तेतील इतर भागीदार संबंधित मालमत्ता विक्री करू शकणार नाहीत असे देखील न्यायालयाने नमूद केला आहे.
संबंधित याचिकाकर्त्याचे आईचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार असून या मालमत्तेतील एक तृतीयांश हिश्यावर मुलीचा अधिकार आहे असं म्हणत न्यायालयाने संबंधित प्रशासनाला मालमत्तेचे बाजारमूल्य काढण्याचे निर्देश दिले आहेत.
Published on: 04 April 2022, 09:06 IST