Others News

पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत असतात त्याची मुख्य कारणे काय आहेत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे ओळखणे खूप गरजेचे आहे. यावर वेळीच लक्ष घातले तर उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. खालील प्रमाणे अन्नद्रव्य व त्यांच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान व लक्षणे दिले आहे.

Updated on 30 August, 2021 2:28 PM IST

नत्र:

झाडाची खालची पाने पिवळी होतात मुळाची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.

उपाय:

१% युरियाची फवारणी करावी. (१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)

स्फुरद:

पाने हिरवट लाबट होऊन वाढ खुंटते, पानाचीं मागील बाजू जांभळट होते.

उपाय:

१-२% (१०० ते २०० ग्रॅम प्रति १०लिटर पाण्यातून) डायअमोनियम फॉस्फेट फवारणी करावी.

 

पालाश:

पानांच्या कडा ताबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखुड होवून शेंडे गळून पडतात.

उपाय

१% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी.(१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)

लोह:

शेड्याकडील पानाच्या शिरामधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते.

उपाय

२५ किलो फेरस सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणे किंवा ०.२% चिलेटेड लोहाची फवारणी करणे.

बोरॉन:

झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात.

सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात.फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.

उपाय:५० ग्रॅम बोरीक असिड

पावडर १० लिटर पाण्यातून पानांवर फवारणी करावी.

जस्त:

पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो व पाने ठिकाणी वाळलेले दिसतात.

 

उपाय:

हेक्‍टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत द्यावे किंवा ०.२% चिलेटेड झिंक पिकांवर फवारावे.

 

मंगल:

पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पान फिक्कट होऊन नंतर पान गळते.

 

उपाय:

हेक्‍टरी १० ते २५ किलो मॅंगेनीज सल्फेट जमिनीतून खतासोबत द्यावे किंवा ०.२% चिलेटेड मंगल ची फवारणी करावी.(२० ग्रॅम +१० लिटर पाणी).

 

मॉलिब्डेनम:

पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो.

 

उपाय:

हेक्टरी पाव ते अर्धा किलो सोडियम मॉलिबडेट जमिनीतून द्यावे.

तांबे:

झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते. झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात.

उपाय:

मोरचूद ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

गंधक:

झाडांच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो व नंतर पाणी पूर्ण पिवळी पांढरी पडतात.

उपाय: हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमीनींतून शेण खतासोबत द्यावे.

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे

९४०४०७५६२८

प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: identify plant nutrients deficiency and symptoms
Published on: 30 August 2021, 02:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)