साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे हा दिवस. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवसापासून करावी. आश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा दीपावली पाडवा म्हणून साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या बलिप्रतिपदा दिवसाचे महत्त्व अधोरेखित होते. . पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीचे चित्र काढून पूजा केली जाते. इडा, दुःखापासून मुक्ती आणि पीडितांचे राज्य, ही प्रार्थना या दिवशी केली जाते.तसेच दिव्यांचा उत्सव देखील केला जातो.
आपल्या कृषी संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व प्राप्त झालेले आपले सर्व सण प्रामुख्याने याच निसर्गावर आधारित आहेत. पौराणिक महत्त्व आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्तिक महिन्याची सुरुवात अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
बलिप्रतिपदेच्या पौराणिक कथांनुसार, राजा बळी हा भक्त प्रल्हादचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. दानशूर बळीराजाच्याराज्यात व्यापार, नोकरी पेक्षा शेती श्रेष्ठ होती धन धाण्याने संपन्न अश्या बळीराजाच्या राज्याची कीर्ती दूरवर पसरली होती वामन बटुक ने बळीराजाची दानशूरता पाहून तीन वरदान मागितले एकवचनी दानशूर बळीराजाने वामन बटुक ला वचन दिले, कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा प्रमुख स्रोत म्हणजे शेती पहिल्या वरदानात वामन बटुक ने बळीराजाच्या राज्यातील सुपीक जमीन मागितली व शेतकऱ्यांची दरिद्री सुरू झाली,
दुसरे वरदान राज्यकारभारात हस्तक्षेप करून वामन बटुक ने स्वतःचे वर्चस्व निर्माण करून तिसऱ्या वरदान प्रमाणे बळीराजाचा सर्वनाश केला छळ कपटी नीतीने हजारों वर्षापासून अठरा विश्व दारिद्य्र घेऊन जगत असलेला जगाचा पोशिंदा बळीराजा आज पण जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, नवयुगातील पुढारी रुपी वामन आज पण शेतकऱ्यांचा नाश करण्यासाठी आत्महत्येला प्रवृत्त करीत आहे, प्रगत वामन हा पूर्वी पेक्षा खुप भयंकर सिद्ध झाला असून आज शेतकरी कष्टाने पिकवून आणलेल्या धान्याचा मालक असून पण त्याला भाव ठरविण्याचा अधिकार नाही, मुक्त पने बियाणे निवडण्याचा अधिकार नाही, कवडीमोल धान्य खरेदी करून सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील भागीदार व्यापारी दुप्पट तिप्पट दामाने नागरिकांना विकतात,
पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीचे चित्र काढून पूजा केल्याने. इडा, दुःखातून सुटका आणि पीडितांचे राज्य येणार नसुन, रात्रंदिवस रक्त आटवून पिकविलेल्या धान्याला शेतकऱ्याच्या घामा एवढी जरी किँमत मिळाली तर देश महासत्ता झाल्या शिवाय राहणार नाही, बळी राज्य येण्यासाठी पूजा रांगोळीची गरज नाही
तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळवुन देण्यासाठी कृषी जाचक बंधनातून मुक्त करण्याची गरज आहे, वामन बटुक ने भूसंपादन करुन एकदाच शेतकऱ्यांना देशोधडीला लावले होते परंतू आजचे पुढारी व व्यापारी शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगराखाली दाबून कष्टाने पिकवलेले धान्य कवडीमोल भावाने खरेदी करतात शेतकऱ्यांच्या ईडा पिडा टाळन्यासाठी
कृषी विषयक सरकारचे धोरण बदलणे गरजेचे आहे,
आज दिवाळी सण प्रत्येकाची दिवाळी सुख समाधानाने जावो आपल्या सुखाच्या काही क्षणात जेंव्हा नवे कपडे परिधान कराल तर कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कष्टाला स्मरण करा एकदा.!
जेव्हा मऊ तुपाची पोळी चा घास घ्याल तेंव्हा आठवा त्या शेतकऱ्याला ज्याने विंचू काट्याचा जंगली प्राण्यांची पर्वा न करता राती गव्हाला पाणी शेंदल एकदा आठवण कराच.!
उन्हातान्हात घाम गाळून पिकविलेल्या धान्यापासून बनविलेली फराळाची चव घेतांना करा आठवण एकदा.!
तुमच्या एकट्याने बदल होईल का अस समजू नका बळीचे राज्य येण्यासाठी भारत देश महासत्ता बनण्यासाठी बिलियन ट्रिलियन चे आकडे पार करण्यासाठीं सुरुवात एकानेच करावी लागेल.
पत्रकार मुख्तार शेख
(7057911311)
Published on: 07 November 2021, 06:53 IST