Others News

मुंबई : देशातील गैर जीवन विमा क्षेत्रात सर्वात मोठी खासगी कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डने ऑनलाईन प्रीपेड कार्ड व्यवहारांमधील भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्रीप्रे कार्डच्या साथीने ग्रुप सेफगार्ड ही आरोग्य विमा योजना आणली आहे.

Updated on 30 October, 2020 11:31 AM IST

मुंबई : देशातील गैर जीवन विमा क्षेत्रात सर्वात मोठी खासगी कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डने ऑनलाईन प्रीपेड कार्ड व्यवहारांमधील भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्रीप्रे कार्डच्या साथीने ग्रुप सेफगार्ड ही आरोग्य विमा योजना आणली आहे.फ्रीपे कार्ड रिटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या सदस्यांसाठी ही विमा योजना आहे. फ्रीपे कार्डधारकाला अपघात झाल्यास अथवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास या विमा योजनेनुसार देय रक्कम मिळणार आहे.

विमाधारकांची संख्या तसेच विम्याची व्यापकता वाढण्यासाठी सुलभता,स्वस्त योजना आणि विस्तार हे अतिशय महत्वाचे घटक आहेत. फ्रीपे कार्डच्या सदस्यांसाठी खास तयार करण्यात आलेली ही छोट्या आकाराच्या ( बाईट साईझ्ड) आरोग्यविमा योजना या व्युहात्मक भागीदारीमुळे फ्रिपेकार्डच्या विविध क्षेत्रातील पार्टनरच्या रिटेल आऊटलेटमध्ये उपलब्ध होणार आहे. फ्रीपेकार्डचे सदस्य जीवनावश्यक वस्तु अथवा सेवांचे शॉपिंग करताना या आरोग्य विम्याचे कवच प्राप्त करु शकतात.आरोग्य विमा योजनेत रुग्णालय उपचारासाठी तीन प्रकारचे पर्याय देण्यात आलेले असून त्यात हॉस्पीटल डेली कॅश बेनिफिट, डेथ बेनेफिट आणि विविध आजारांसाठी रुग्णालयात उपचार यांचा समावेश आहे. 

हॉस्पीटल डेली कॅश बेनिफीटमध्ये विमाधारकांना जास्तीत जास्त तीस दिवसांसाठी ६० हजार रुपयांच्या रक्कमेचा लाभ मिळेल. हे विमा कवच एका वर्षासाठी अवघ्या ६९९ रुपयांत मिळविता येईल. देशातील कोणत्याही सरकारी अथवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी हे कवच उपयुक्त ठरेल. फ्रीपे कार्डच्या सदस्यांनी अगोदरच आरोग्य विमा उतरविलेला असल्यास अथवा त्यांना नोकरी-कामाच्या ठिकाणी आरोग्य विम्याचा लाभ मिळत असला तरी त्यांना हे आरोग्य विमा कवच घेता येऊ शकते. योजनेतील मृत्यूपश्चात लाभ (डेथ बेनिफिट) अथवा वैयक्तिक अपघाती विमा कवच हे दुसरे कवच एका वर्षासाठी ६९९ रुपये भरुन मिळविता येईल. अपघाती मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास १० लाखाची भरपाई तसेच विमाधारकाचा अपघाती मृत्यू अथवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पालकत्व देखभालीसाठी ९० हजार रुपयांचा लाभ या दुसऱ्या कवचात दिला जाणार आहे.

विविध प्रकारच्या आजारांमुळे ७५ हजार रुपयांचे रुग्णालय उपचाराचे कवच अवघ्या ३७९ रुपये भरुन एक वर्षासाठी मिळविता येईल. योजनेत समाविष्ट असलेले आजार तसेच मलेरिया आजारावर रुग्णालयातील उपचारासाठी ७५ हजाराचा खर्च ही पॉलिसी देईल. विविध आजारात डेंगी, चिकनगुनिया, काला आजार, जपानी एन्सेफॅलिटीस आणि फिलेरीयासिस या आजारांचा या विमा योजनेत समावेश आहे. परंतु विम्याचा लाभ मिळण्यासाठी रुग्णालयात किमान ४८ तास उपचार आवश्यक आहेत.फ्रीपेकार्डचे १८ ते ६५ वयोगटातील सदस्य या योजनेसाठी पात्र ( कोणत्याही वैद्यकीय पुर्वचाचणीविना) आहेत. याचबरोबर कार्डधारक तिन्ही किंवा तीनपैकी कोणतेही विमाकवच त्यांच्या गरजेनुसार निवडू शकतात आणि स्वतःला विम्याचे कवच प्राप्त करु शकतात

नवीन विमा योजनेच्या घोषणेप्रसंगी बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचे विशेष संचालक संजीव मंत्री म्हणाले की, नाविन्यता तसेच आमच्या ग्राहकांच्या मदतीसाठी विमा क्षेत्रात सर्वात अगोदर पुढाकार घेत करत आमच्या निर्भय वादे या तत्वाचे सातत्याने पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच सध्याच्या नव्या परिस्थितीत ग्राहकांना सुटसुटीत पर्याय देण्यासही आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. फ्री़पेकार्डच्या सदस्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात आर्थिक हातभार आणि मानसिक शांतता मिळवून देण्यासाठी विविध साजेसे विमाकवच देत असून त्याकरिता फ्रिपे कार्डबरोबर भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डबरोबरील सहकार्याबाबत टिप्पणी करताना फ्रिपेकार्ड रिटेल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड अॅण्ड्रू म्हणाले की, या महान देशातील अधिकाधिक नागरिकांना आमच्या योजनेचे सदस्य बनविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.

English Summary: ICICI Lombard brings Group Safeguard Health Scheme
Published on: 30 October 2020, 11:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)