Others News

हुंडाई भारतातील एक प्रमुख मोटोकॉर्प कंपनी आहे. कंपनीची Huindai i10 हि कार देशात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गाड्यांच्या यादीत सदैव बनलेली असते. हि गाडी आपल्या स्टायलिश लूकमुळे आणि दमदार फिचर्समुळे ओळखली जाते. अनेक लोकांना हि गाडी मोठी पसंत असते परंतु पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने हि एवरग्रीन कार खरेदी करण्यापासून वंचित राहत असतात.

Updated on 06 March, 2022 3:03 PM IST

हुंडाई भारतातील एक प्रमुख मोटोकॉर्प कंपनी आहे. कंपनीची hyundai i10 हि कार देशात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गाड्यांच्या यादीत सदैव बनलेली असते. हि गाडी आपल्या स्टायलिश लूकमुळे आणि दमदार फिचर्समुळे ओळखली जाते. अनेक लोकांना हि गाडी मोठी पसंत असते परंतु पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने हि एवरग्रीन कार खरेदी करण्यापासून वंचित राहत असतात.

त्यामुळे आज आपण या गाडीवर सुरु असलेल्या एका तगड्या ऑफरविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो देशात जेवढी नव्या गाड्यांना डिमांड असते तेवढीच डिमांड सेकंड हॅन्ड गाड्यांना देखील बघायला मिळत असते. त्यामुळे जर आपल्याकडे Hyundai i10 ही गाडी नव्याने खरेदी करण्यासाठी पैसा नसेल तर आपण ही गाडी सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता. आज आपण हुंडाई कंपनीच्या या Hyundai i10 गाडीवर एका सेकंड हॅन्ड विक्री करणाऱ्या साईटने दिलेल्या ऑफर विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग वाचक मित्रांनो जाणून घेऊया आजच्या या खास ऑफरविषयी.

मित्रांनो देशात सेकंड हॅन्ड कार आणि बाईक विक्री करण्यासाठी अनेक कंपन्या काम करीत आहेत या कंपन्या सेकंड हॅन्ड गाडींची खरेदी देखील करत असतात मात्र असे असले तरी गाडी खरेदी करताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला जात असतो अनेक ठिकाणी गाड्यांच्या खरेदी-विक्री मध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खरेदी करताना विशेष काळजी घेणे अपरीहार्य झाले आहे. मित्रांनो, सेकंड हॅन्ड Hyundai i10 ही गाडी Droom या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, या गाडीसाठी 96 हजार 38 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. 

Hyundai i10 era या गाडीचे 2008 वर्षाचे मॉडेल या साइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. साइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी केवळ 88 हजार किलोमीटर धावली आहे. जर आपणास ही गाडी खरेदी करायची असेल तर आपण या साइटवर एकदा भेट देऊ शकता, मात्र खरेदी करताना कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करणे बंधनकारक राहणार आहे.

English Summary: hyundai i10 car is now available at only 1 lakh rupees learn more about it
Published on: 06 March 2022, 03:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)