काही लोकांच्या बेशिस्तपणे वाहन चालवणामुळे अपघात कधीही आणि केव्हाही होऊ शकतो. रस्ते वाहतूकीत दररोज अपघात होत असतात ही गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु केली आहे. या योजनेतून लोकांना आर्थिक साहाय्य मिळणार आहे. PMSBY ही एक अपघात विमा योजना असून यातून गरीब आणि मध्यमवर्गीयांना मदत होणार आहे. PMSBY ही योजना रस्ते अपघाती मृत्यू कव्हर देते शिवाय अपंगत्व आल्यासही या योजनेतून फायदा मिळतो. विशेष म्हणजे दरवर्षाला ही योजना किंवा स्कीमचे नूतनीकरण होत असते.
पीएमएसबीवाय PMSBY योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती उच्च प्रीमियम घेत नाही. वर्षाला फक्त १२ रुपयांचे प्रीमियम घेतले जाते. ज्या व्यक्तींचे वय हे १८ ते ७० वर्षाच्या दरम्यान आहे. आणि त्यांचे बचत खाते आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. पीएमएसबीवायमध्ये अपघातातील मृत्यू व अपंगत्वचाही समाविष्ट आहे. योजनेच्या लाभार्थ्याने आत्महत्या केली तर त्याच्या कुटुंबियांना याचा फायदा होत नाही. दरम्यान जर कोणाचा खून झाला तर त्याचा या योजनेत समावेश करून त्याला लाभ दिला जातो. प रंतु आंशिक अपंगत्वाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत समावेश होत नाही. या योजनेच्या अंतर्गत कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास आणि अपघातात मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचे कव्हर मिळत असते. पण आंशिक अपंगत्व हे कायमस्वरुपी असेल तर त्याला १ लाखाचे कव्हर मिळते म्हणजे एक लाख रुपयाचे आर्थिक साहाय्य या योजनेतून दिले जाते. पीएमएसबीवाय मध्ये अपघातानंतर रुग्णालयाच्या खर्चावरुन भरपाईची कोणतीही तरतूद नाही.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे कोणते फायदे आहेत?
पीएमएसबीवाय आपल्या इच्छेनुसार सुरू किंवा बंद करता येते.
इतर पॉलिसींच्या तुलनेत जास्त खर्च न करता ही योजना अपघात विमा पॉलिसी प्रदान करते. जर विमा घेतलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास नॉमिनीला २ लाख रुपये मिळतात.
कायमस्वरूपी अपंगत्व, जसे की दोन्ही डोळ्यांचे अपरिवर्तनीय किंवा एकूण नुकसान, दोन्ही हात किंवा पाय गमावणे याला २ लाख रुपये दिले जातात. नॉमिनी व्यक्तीरिक्त विमाधारकाच्या कुटुंबियांनाही पैसे मिळतात. आंशिक अपंगत्व असल्यास विमाधारकास रु. 1 लाख कव्हरेज मिळतो. पीएमएसबीवायचा हप्ता प्रीमियम तुमच्या बँक खात्यातू आपोआप कापला जातो. विशेष म्हणजे तुमचा टॅक्स वाचविण्यातही याचा फायदा होतो.
पीएमएसबीवायसाठी अर्ज कसा करावा How to apply for PMSBY
भारतातील जवळपास सर्व आघाडीच्या बँका ही योजना देतात, म्हणून अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जावे लागेल किंवा ऑनलाईन नोंदणी देखील करावी लागेल.
या बँका पुरवतात PMSBY ची सेवा
State Bank of India PMSBY
Download form https://sbi.co.in/documents/14463/22726/consent+cum+declaration+PMSBY.pdf
ICICI PMSBY
https://www.icicibank.com/Personal-Banking/insurance/pm-bima-yojana-apply.page
HDFC PMSBY
Axis bank PMSBY
https://www.axisbank.com/retail/insurance/pradhan-mantri-suraksha-bima-yojana/features-benefits
Bank of Baroda PMSBY
https://www.bankofbaroda.in/pmsby.htm
Published on: 23 May 2020, 01:18 IST