रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली. ऑगस्ट २०१९ नंतर पहिल्यांदा म्हणजे तब्बल दोन वर्षांनंतर रेपो रेट वाढणार आहे. मागील कोरोना काळात अर्थव्यवस्था मंदावली होती. यावेळी मध्यवर्ती बँकाकडून स्वस्तात कर्ज दिले जात होते जेणेकरून लोक आपल्या गरजा भागवतील. पण, आता भारतात महागाई वाढत असून, वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली.
रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन, धातू तसेच अन्नधान्याचे दर वाढत आहेत. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, चीनमध्येही कोरोना वाढला आहे त्यामुळे चीनमधून येणार कच्चं तेल, रासायनिक खतं महाग झालीत. यामुळे भारतात महागाई वाढत आहे.
मागील पंधरा महिन्यात सर्वाधिक महागाई मार्च महिन्यात वाढली तब्बल ६.९५% उच्चांक गाठला. महागाईवर नियंत्रण असावे म्हणून रिझर्व्ह बँक प्रयत्न करत असते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने तातडीची बैठक बोलावत रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला. याबाबत कोणतीही पत्रकार परिषद घेतली नसून ट्विटर वरून शक्तीकांत दास यांनी माहिती दिली.
रेपो दराचा महागाईशी काय संबंध आहे.
रेपो दर म्हणजे 'रिपरचेझिंग ऑपशन' म्हणजेच आपली बँक ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते तो दर होय. रेपो दर वाढल्यामुळे आपली बँक रिझर्व्ह बँकेकडून जे कर्ज घेते ते महागणार आहे. हे कर्ज महागल्यामुळे बँक कमी प्रमाणात कर्ज वाटप करेल. याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होईल.
म्हणजेच बँकेकडून कर्ज घेऊन खरेदी करण्याचे प्रमाण कमी होईल, खरेदी कमी झाल्यास वस्तूंची मागणी कमी होईल परिणामी महागाई कमी होईल. असा यामागचा उद्देश असतो. ही एक साखळी आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात ४० अंकांची वाढ होऊन तो ४.४०% वर आलाय. तर कॅश रिझर्व्ह रेशोमध्येही ५० अंकांची वाढ झालीय.
आपल्यावर काय परिणाम होणार
रिझर्व्ह बँकेकडून आपल्या बँकेला मिळणारे कर्ज महागले आहे त्यामुळे आपण घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरावर वाढ होणार असून, येणाऱ्या काळात कर्ज घेणे अधिक महागणार आहे.
यामध्ये कर्ज महागणार असलं तरी तुमची बँकेत बँकेत मुदतठेव असेल तर यांच्यावरचे व्याजदर आता वाढतील. ठेवी आणि इतर गुंतवणुकीवरही तुम्हाला जास्त परतावा मिळेल.
महत्वाच्या बातम्या
प्रेयसीसोबत जंगलात फिरायला गेला, जीव गमावला; वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
आई, वडील मजूर तर तो विकायचा भाजी; असा झाला दिवाणी न्यायाधीश
Published on: 06 May 2022, 10:30 IST