भारतात आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. देशात या कागदपत्र विना कुठलेच सरकारी तसेच गैरसरकारी (Government as well as non-government) काम केले जाऊ शकत नाही. भारतात बँकेपासून तर रेशन घेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. देशातील नागरिकांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य असते आधार कार्ड विना देशातील कुठल्याच सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ प्राप्त होऊ शकत नाही. आधार कार्डची उपयोगिता दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे या महत्त्वाच्या कागदपत्रात मोठ्या प्रमाणात घोटाळा देखील होत आहे. आधार कार्डचा चुकीचा वापर करून अनेक लोक धोका धडी करताना नजरेस पडत आहेत. त्यामुळे सरकार वेळोवेळी आधार कार्डची सुरक्षा मजबूत करण्यासाठी उपाय योजना आखत असते. आपण घरबसल्या आपले आधार कार्ड ओरिजनल आहे की डुप्लिकेट हे ऑनलाइन पद्धतीने जाणू शकतात शिवाय आपण आपले आधार कार्ड लॉक (Aadhaar card lock) करून आधार कार्ड द्वारे होणारी आपली फसवणूक देखील टाळू शकता. आपण घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे आपले आधार कार्ड लॉक अथवा अनलॉक करू शकता.
आधार कार्ड लॉक केल्याने होणारे फायदे (Benefits of Locking Aadhar Card)
भारतात आधार कार्ड युआयडीएआय या संस्थेद्वारे जारी केले जाते. UIDAI भारतीय नागरिकांना आपले आधार कार्ड लॉक करण्याची सेवा देखील पुरवीत असते. आधार कार्ड लॉक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर आपले आधार कार्ड हरवले, तर कुठलाही व्यक्ती याचा गैरवापर करू शकत नाही. आणि त्यामुळे साहजिकच आपला डेटा सुरक्षित राहतो.
कसे करणार आधार लॉक (How to lock the Aadhar)
मित्रांनो जर आपणास आपले आधार कार्ड लॉक करायचे असेल, तर आपल्या आधार कार्ड ला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरून 1947 या नंबर वर GETOTP असा संदेश लिहून पाठवावा लागेल. एवढे केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल. आपणास हा ओटीपी 'LOCKUID आधार नंबर' असा संदेश लिहून परत 1947 या नंबर वर पाठवावा लागेल. मित्रांनो फक्त एवढे केल्यावरच आपले आधार कार्ड लॉक केले जाईल.
आधार कार्ड अनलॉक कसे करणार (How to unlock Aadhar card)
मित्रांनो आपण जर आपले लोक केलेले आधार कार्ड परत अनलॉक करू इच्छित असाल तर आपणास आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून 1947 या नंबरवर GETOTP असा मेसेज लिहून पाठवावे लागेल. हा मेसेज पाठविल्यानंतर आपल्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. आपणास ओटीपी प्राप्त झाल्यानंतर, 'UNLOCKUID आधार नंबर' आणि ओटीपी लिहून परत त्याच नंबर वर पाठवावा लागेल. मित्रांनो एवढे केल्यानंतर आपले आधार कार्ड परत अनलॉक केले जाईल.
Published on: 11 January 2022, 11:00 IST