भारतात 2016 ला नोटबंदी करण्यात आली ती काळे धन अर्थात ब्लॅक मनी नष्ट करण्यासाठी तसेच चलणातील जुन्या 500 च्या आणि हजाराच्या नोटा चलनबाह्य केल्यामुळे नकली नोटा ह्या कागदासमानाच राहिल्या. आताच्या नवीन चलनात आलेल्या नोटा ह्यांना देखील आता पाहता-पाहता 5 वर्ष होत आले आणि जसजश्या ह्या नोटा चलनात जुन्या होत चालल्या आहेत ह्यांच्या नकली नोटांची संख्या देखील वाढत आहेत. लोकांना नकली नोटा ह्या ओळखणे फार कठीण होते आणि त्यामुळे त्यांची हानी होते. लोकांना नोटा ह्या एटीएम मधून सुद्धा काहीवेळा नकली प्राप्त होतात.
त्यामुळे लोकांना आपल्या जवळ असलेल्या नोटा ह्या नकली आहेत ह्याची कल्पना बँकेशिवाय कुठेच मिळत नाही. आपल्या भारतीय बाजारात सर्वात जास्त चलनात ह्या 500 च्याच नोटा आहेत. 2000 च्या नोटा त्या तुलनेत कमी प्रमाणात चलनात आहेत. मित्रांनो तुमची नकली नोटांपासून होणारी फसवणूक टाळता यावी म्हणुन कृषी जागरण आपल्यासाठी 500 ची नकली नोट कशी ओळखावी ह्याविषयीं महत्वाची माहिती घेऊन आले आहे. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया तुमच्याजवळ असलेल्या 500 च्या नोटा नकली आहेत की असली.
मित्रांनो भारतात वर्ष 2020-2021 ह्या काळात जवळपास 5.45 करोड रुपयांच्या नकली नोटा ह्या प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या नकली नोटा ह्या आरबीआय आणि इतर बँकाना मिळाल्या म्हणजे अजून कितीतरी अधिक पटीने नकली नोटा ह्या बाजारात चलनात असतील. आरबीआय ani इतर बँकाना 2,08,625 नकली नोटा मिळाल्या आहेत.
ओरिजिनल 500ची नोट अशी ओळखा
»ओरिजिनल नोट लाईट समोर अथवा सूर्यप्रकाशात पकडली असता नोटवर 500 चा आकडा लिहलेला दिसेल.
»ओरिजिनल 500ची नोट 45 अंशाचा कोन करून डोळ्यासमोर पकडल्यास नोटवर 500 लिहिलेले दिसेल.
»ओरिजिनल 500च्या नोटवर देवनागरी लिपीत 500 चा आकडा दिसेल.
»ओरिजिनल 500च्या नोटमध्ये महात्मा गांधीजींचा फोटो हा सेंटर मध्ये असतो.
»भारत आणि INDIA हे अक्षर नोटवर लिहलेले दिसतील.
»जर तुम्ही ओरिजिनल 500ची नोट नोट थोडीशी वाकवली तर सुरक्षा धाग्याच्या (Security Thread) रंगाचा कलर हा हिरवा ते इंडिगो कलरमध्ये बदलताना दिसेल.
»500च्या जुन्या नोटेच्या तुलनेत नव्या 500च्या नोटवर गव्हर्नरची स्वाक्षरी, हमी कलम, वचन खंड आणि आरबीआयचा लोगो हा थोडा उजव्या बाजूला सरकवला गेला आहे.
»500 च्या ओरिजिनल नोटमध्ये डावीकडे वरच्या बाजूला आणि उजवीकडे तळाशी असलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.
»येथे लिहिलेल्या 500च्या आकड्याचा रंग बदलतो. ह्या आकड्याचा रंग हिरवा ते निळा असा बदलतो.
»ओरिजिनल 500च्या नोटवर उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे.
»उजव्या बाजूला 500 असा आकडा लिहलेले लिहिलेले वर्तुळ बॉक्स, उजव्या आणि डाव्या बाजूला 5 ब्लीड रेषा आणि अशोक स्तंभाचे प्रतीक, महात्मा गांधींचे चित्र, रफली मुद्रित आहे.
»ओरिजिनल नोटवर नोटा ज्या वर्षी छापल्या गेल्या आहेत ते वर्ष नमूद केले गेले आहे.
»ओरिजिनल नोटवर स्वच्छ भारतचा लोगो घोषवाक्यासह प्रिंट केला गेला आहे.
»ओरिजिनल नोटवर मध्यभागी एक भाषाचा पॅनेल आहे.
»ओरिजिनल नोटवर तिरंगाच्या चित्रासह लाल किल्ल्याचे चित्र आहे.
»ओरिजिनल नोटवर देवनागरीमध्ये 500 प्रिंट केले गेले आहे.
Published on: 27 October 2021, 10:06 IST