Others News

भारतात जेव्हापासून दहा रुपयाचा डॉलर चलनात आणला गेला आहे तेव्हापासून दहा रुपयाच्या डॉलरविषयी लोकांच्या मनात अनेक शंका-आशंका उत्पन्न होत आल्या आहेत. यासंदर्भात भारत सरकार तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया वेळोवेळी लोकांसाठी महत्वपूर्ण माहिती जारी करत असतात. देशात परत एकदा दहा रुपयाच्या डॉलर विषयी भ्रामक माहिती झपाट्याने पसरत आहे, त्या अनुषंगाने सरकारने पुन्हा एकदा सामान्य लोकांचे कन्फ्युजन दूर करण्यासाठी महत्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दहा रुपयाच्या डॉलरचे देशात सुमारे चौदा प्रकारचे डिझाईन तयार केले गेले आहेत. त्यामुळे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी देशवासीयांना संबोधन करताना सांगितले की, देशात जेवढ्या प्रकारचे डॉलर चलनात आणले गेले आहेत ते सर्व वैध आहेत. त्यामुळे चलनात असलेले सर्व दहाचे डॉलर ओरिजनल असून याला कोणीच घेण्यास नकार देऊ शकत नाही.

Updated on 13 February, 2022 6:57 PM IST

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दहा रुपयाच्या डॉलरचा संदर्भात एका लेखी उत्तरात म्हटले आहे की, भारत सरकारच्या अधिकाराखाली तयार केलेले आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेले विविध आकाराचे आणि डिझाइनचे सर्व 10 रुपयाचे डॉलर (10 रुपयाची नाणी) कायद्याने वैध आहेत. हे डॉलर कायदेशीर निविदा म्हणून सर्व व्यवहारांमध्ये वापरले जाऊ शकतात, याला घेण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दहा रुपयाचे डॉलर वेळोवेळी आर्थिक सामाजिक राजकीय घटना दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तयार केले जातात. त्यामुळे लोकांमध्ये दहा रुपयाचे असली आणि नकली डॉलर असतात अशी धारणा तयार झाली आहे. अनेकजण ₹ हे चिन्ह असलेले डॉलर ओरिजनल असल्याचे सांगतात तर अनेकजन दहा कांड्या असलेले डॉलर ओरिजनल असल्याचे सांगतात, मात्र असे काही नसून सर्व दहा रुपयाचे डॉलर हे ओरिजिनल आहेत.

आरबीआयने देखील सर्व दहा रुपयाचे डॉलर वैध असल्याचे सांगितले आहे तसेच सेंट्रल बँकने देखील आपल्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती दिली असून, दहा रुपयाच्या डॉलरच्या 14 डिझाईन दाखवल्या आहेत. एवढेच नाही तर लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक IVRS टोल फ्री नंबर देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये 10 रुपयांच्या नाण्याशी संबंधित माहिती दिली आहे.  आरबीआयचे म्हणणे आहे की सर्व प्रकारची नाणी योग्य आणि वैध आहेत आणि लोकांनी ती घेण्यास नकार देऊ नये.  जर कोणी 10 रुपयाची नाणी घेण्यास नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. चलनात असलेल्या दहा रुपयाच्या नाण्यांचे खरेपणा तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 14440 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.

जर आपण या नंबर वर कॉल केला तर फोन डिस्कनेक्ट होईल. त्यानंतर या नंबरवरून लगेच एक कॉल येईल, ज्यामध्ये IVRS द्वारा 10 रुपयाच्या नाण्यांची संपूर्ण माहिती दिली जाईल. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, देशात 10 रुपयांची 14 प्रकारची नाणी प्रचलित आहेत, आणि ते स्वीकारणे सर्वांवर बंधनकारक आहे. एवढेच नाही तर या संदर्भात काही शंका असतील तर आपण टोल फ्री नंबर वर कॉल करून आपल्या शंका दूर करू शकता.

English Summary: how to identify original 10 rupee coin
Published on: 13 February 2022, 06:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)