Others News

भारतात आधार कार्ड महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून ओळखले जाते. जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड गरजेचे असते. आधार कार्डचा उपयोग रहिवासाच्या पुराव्यासाठी तसेच ओळखपत्र म्हणून देखील केला जातो. भारतात आधार कार्ड विना एक सिम कार्ड देखील खरेदी केले जाऊ शकत नाही. आधार कार्डबँकेत खाते खोलण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, शाळा-महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक कागदपत्र म्हणून उपयोगात आणले जाते.

Updated on 10 January, 2022 4:41 PM IST

भारतात आधार कार्ड महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून ओळखले जाते. जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड गरजेचे असते. आधार कार्डचा उपयोग रहिवासाच्या पुराव्यासाठी तसेच ओळखपत्र म्हणून देखील केला जातो. भारतात आधार कार्ड विना एक सिम कार्ड देखील खरेदी केले जाऊ शकत नाही. आधार कार्डबँकेत खाते खोलण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, शाळा-महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक कागदपत्र म्हणून उपयोगात आणले जाते.

आधार कार्डचा वापर जवळपास सर्व प्रकारच्या सरकारी व गैर सरकारी कामात केला जातो. भारतात आधार कार्ड ची सुरुवात काँग्रेसच्या काळात करण्यात आली होती. 2009 मध्ये देशात आधार कार्ड सर्वप्रथम लॉन्च करण्यात आले होते. तेव्हापासून दिवसेंदिवस आधार कार्ड चे महत्त्व वाढतच चालले आहे. आजच्या घडीला भारतात आधार कार्ड बिना कुठलेही काम केले जाऊ शकत नाही. अशा या महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटचा अनेकदा चुकीच्या पद्धतीने देखील वापर केला जातो. त्यामुळे आधार कार्ड सुरक्षितरीत्या उपयोगात आणणे गरजेचे असते. आज आपण अशाच महत्त्वाच्या आधार कार्ड विषयी एक महत्त्वाची बाब जाणून घेणार आहोत. आज आपण आपले आधार कार्ड ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे कसे चेक करायचे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण माहिती विषयी.

अलीकडे मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट आधार कार्ड उपयोगात आणून मोठ्या प्रमाणात धोखाधडी केली जाते. त्यामुळे आपल्या मनात देखील आपल्या आधार कार्ड विषयी संभ्रमता बनते. त्यामुळे आपल्या साठी आपले आधार कार्ड ओरिजनल आहे की डुप्लीकेट याची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. पण चिंता करू नका आता आपण घरबसल्या आपले आधार कार्ड ओरिजनल आहे का डुप्लिकेट याविषयी सविस्तर जाणून घेऊ शकता.

आधार कार्ड ओरिजनल आहे का डुप्लिकेट कसं करणार चेक (How to check whether Aadhar card is original or duplicate)

मित्रांनो जर आपणास आपल्या आधार कार्ड ची सत्यता तपासायची असेल तर आपणास सर्वप्रथम आधार कार्डच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. मित्रांनो आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या ब्राउझर मध्ये जाऊन uidai.gov.in या आधार कार्ड च्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्या. वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपणास वेब साईटच्या मुख्य पेज वर माय आधार (My Aadhar) असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. माय आधार या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन होईल त्यात आधार कार्डशी निगडीत सर्व प्रकारच्या सेवा बघायला मिळतील.

यापैकी व्हेरिफाय आधार नंबर (Verify Aadhar Number) या पर्यायावर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर आपला बारा अंकी आधार कार्ड क्रमांक तिथे प्रविष्ट करा त्यानंतर खाली कॅप्टचा कोड भरावा लागेल एवढे केल्यानंतर प्रोसीड टू व्हेरिफाय (Proceed To Verify) या बटन वर क्लिक करा. जर आपण प्रविष्ट केलेली माहिती बरोबर असेल तर एवढ केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्या नवीन पेज वरती आधार कार्ड क्रमांकासोबत वय, लिंग आणि राज्य अशी माहिती असेल. येथे आधार कार्ड केव्हा जारी केले होते याविषयी नमूद केलेले असेल. जर कार्ड कधीही जारी केले गेले नसेल. तर यासंदर्भात तेथे काहीच नमूद केलेले नसेल.

English Summary: how to check if aadhar original or duplicate
Published on: 10 January 2022, 04:41 IST