Others News

शेती आणि रासायनिक खते हे एकमेकांशी निगडित असे समीकरण आहे. अगदी शेतीच्या मशागती पासून शेतकरी खत खरेदीसाठी लगबग करताना दिसतात. परंतु बऱ्याच वर्षापासून निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार केला तर गेल्या दोन-तीन वर्षापासून खतांची प्रचंड प्रमाणात टंचाई भासत आहे. परत शेतकऱ्यांना धावपळ करूनही वेळेवर खत उपलब्ध होत नाही.

Updated on 24 August, 2021 12:48 PM IST

शेती आणि रासायनिक खते हे एकमेकांशी निगडित असे समीकरण आहे. अगदी शेतीच्या मशागती पासून शेतकरी खत खरेदीसाठी  लगबग करताना दिसतात. परंतु बऱ्याच वर्षापासून निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार केला तर गेल्या दोन-तीन वर्षापासून खतांची प्रचंड प्रमाणात टंचाई भासत आहे. परत शेतकऱ्यांना धावपळ करूनही वेळेवर खत उपलब्ध होत नाही.

.त्यातल्या त्यात दरवर्षीयुरियाची टंचाई तर पाचवीलाच पुजलेले असते. परंतु आपण विचार करतो किंवा तसं ती आपल्याला कळते की बऱ्याच अंशी ही टंचाई खत विक्रेत्यां द्वारे निर्माण केली गेलेली असते. यामागे बऱ्याच औषध दिसून येते की, साठा शिल्लक नसल्याचे सांगून खतांची साठवणूक करून संबंधित खतांचा भाव वाढविण्याचा दुकानदाराचा प्रयत्न असतो. यासाठी संबंधित दुकानात खत साठा किती उपलब्ध आहे याबाबतची माहिती आपल्याला असणे फार गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल वरून अवघ्या काही मिनिटात उपलब्ध खतांचा साठा किती आहे याबद्दल माहिती जाणून घेऊ.

 दुकानातील उपलब्ध खतसाठा कसा पहावा?

 याबाबतीत महत्त्वाचे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडून खताचा साठा विषयी कोणत्या दुकानात किती साठा उपलब्ध आहे याची माहिती दररोज अपडेट केली जाते. यासाठी तुम्हाला fert.nic. in या संकेतस्थळाचा आधार घ्यावा लागेल. हे संकेत स्थळ ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर भारत सरकारचे रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाइट ओपन होते. या ओपन झालेल्या साइटवर उजवीकडील फर्टीलायझर डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक केल्यास ईउर्वरक नावाचे नवीन पेज ओपन होते. या ओपन झालेल्या पेजवर किती शेतकरी अनुदानीत दराने खताची खरेदी करतात, देशातील खत विक्रेत्यांची संख्या, महिन्याच्या एका तारखेपासून  शेवटच्या तारखेपर्यंत संबंधित दुकानातून किती खताची विक्री झाली याबाबत सविस्तर आकडेवारी असते. याच पेजवर उजवीकडे किसान कॉर्नर या पर्यायावर क्लिक केल्यास रिटेलर ओपनिंग स्टॉक येजऑन टुडे म्हणजेच आज या दुकानात किती करता साठा उपलब्ध आहे हे आपल्याला समजते. या ठिकाणी  सगळ्यात अगोदर तुमचा राज्य आणि जिल्हा निवडायचा असतो.

त्यानंतर तुमच्याकडे त्या दुकानदाराचा आयडी म्हणजेच रिटेलर आयडी असेल तर तो टाकावा लागतो. जर तुमच्याकडे आयडी नसेल तर एजन्सी नेमया पर्याय समोर दुकानाच्या नाव निवडू शकता.

 याद्वारे मिळेल खताच्या किमती ची माहिती

 यापैकी कोणतीही माहिती नसेल तर तुम्ही ऑल हा पर्याय ठेवून showया पर्यायावर क्लिक करून जिल्ह्यातल्या कोणत्या दुकानात किती साठा शिल्लक आहे याची माहिती पाहू शकता. यामध्ये सिलेक्ट रिटेलर या पर्याय अंतर्गत तुम्ही तुमच्या भागातील दुकानाचे नाव निवडून शो या पर्यायावर क्लिक केल्यास त्या दुकानात खताचा साठा शिल्लक आहे की नाही लगेच समजू शकेल. त्यानंतर येथे असलेल्या रिटेलर आयडीवर तुम्ही क्लिक केलं की, संबंधित विक्रेत्याकडे कोणत्या कंपनीचा खताचा किती साठा उपलब्ध आहे आणि त्याचा दर किती आहे याची सविस्तर माहिती पाहायला मिळते.

 

English Summary: how to check fertilizer storage by mobile
Published on: 24 August 2021, 12:48 IST