मित्रांनो भारतात फसवणूक करून सिमकार्ड घेण्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत. त्यामुळे सिमकार्डचा अनधिकृत वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, तुमच्या नावावर सिम कार्ड घेऊन कोणी फसवणूक केली आहे हे आता तुम्ही अवघ्या काही मिनिटात तपासू शकता.
यासंदर्भात दूरसंचार विभागाने (DoT) वेबसाइट जारी केली आहे. ही अतिशय उपयुक्त वेबसाइट आहे. याद्वारे तुमच्या आधार कार्डवर किती सिम चालू आहेत, हे कळू शकणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखादे सिम कार्ड चुकीच्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डचा वापर करून काढले गेले आहे, तर तुम्ही ते बंद देखील करू शकता.
आम्ही tafcop.dgtelecom.gov.in या पोर्टलबद्दल बोलत आहोत. ही वेबसाइट दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आली आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या आधार कार्डवर किती सिम जारी केले आहेत हे तपासता येणार आहे. याशिवाय कोणतेही अनधिकृत सिम बंद करण्याची विनंती येथून करता येणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आलेत अच्छे दिन!! आता पगारात झाली 'इतकी' वाढ
आज आम्ही आपणास याची सर्व प्रोसेस सांगणार आहोत. मित्रांनो तुमच्या आधार कार्ड वर किती सिम चालू आहेत हे तपासण्यासाठी यासाठी तुम्हाला tafcop.dgtelecom.gov.in वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला त्यात तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जारी केलेल्या सर्व क्रमांकांची यादी दाखवली जाईल. येथे तुम्ही नंबर बंद करण्याची विनंती देखील करू शकता. यासाठी तुम्हाला नंबरसमोर दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, DoT ची ही वेबसाइट सध्या फक्त तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. असे मानले जात आहे की ती लवकरच भारतातील उर्वरित राज्यांसाठी सुरु केली जाईल. तथापि, यास थोडा वेळ लागू शकतो. पण सध्यातरी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात.
Published on: 25 May 2022, 06:55 IST