Others News

केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेची सुरुवात २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेविषयी आपण अनेकवेळा ऐकले असेल. या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही विशेष पात्रता नाही. पण आपल्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेच्या सहाय्यातून आपल्याला उतरत्या वयात आर्थिक मदत मिळते.

Updated on 02 April, 2020 1:54 PM IST


केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेची सुरुवात २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेविषयी आपण अनेकवेळा ऐकले असेल.  या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही विशेष पात्रता नाही. पण आपल्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.  योजनेच्या सहाय्यातून आपल्या उतरत्या वयात आर्थिक मदत मिळत असते.   म्हतारपणात अनेकजणांकडे पैसा नसतो, अशा नागरिकांचे दुख दूर करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.  अटल पेन्शन योजना ही असंघटित मजुरांसाठी फार महत्त्वाची आहे.  याआधी असंघटित मजुरांसाठी अशी योजनाच नव्हती.  या योजनेच्या अंतर्गत गुंतवणूक केल्या आपल्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आपण निवृत्त झाल्यानंतर आपल्याला दर महा पेन्शन मिळते.  या योजनेचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे जर आपला अनैसर्गिक मृत्यू झाला तर याचा फायदा आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांना होतो.  या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नीला पैसे मिळतात.  जर पत्नीचाही मृत्यू झाला तर त्यांच्या मुलांना ही पेन्शन मिळेल अशी तरतूद यात करण्यात आली आहे.  ही पेन्शन घेण्यासाठी आपल्याला काही वर्षाच्या कालावधी पर्यंत गुंतवणूक करावी लागते.

कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ
अटल पेन्शन योजनेत कोणताही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करु शकते.  फक्त आपल्याकडे बँकेचे खाते असणे आवश्यक असते.  आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे. अटल पेन्शन घेण्यासाठी आपल्याला साधारण २० वर्ष गुंतवणूक करावी लागते. या योजनेत १८ ते ४० वर्षापर्यंतचे नागरीक सहभाग घेऊ शकतात.

किती मिळते पेन्शन
आपण या योजनेत किती गुंतवणूक करतो यावर आपल्या पेन्शनची मर्यादा निश्चित होत असते. अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त ५ हजार रुपयांचे मासिक पेन्शन मिळू शकते. वयाच्या ६० व्या वर्षी या योजनेचा फायदा आपल्याला मिळेल
जर एखादी व्यक्ती वयाच्या १८ वर्षी या योजनेत गुंतवणूक करेल तर त्याला फक्त दर महा २१० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. आणि निवृ्त्त झाल्यानंतर आपल्याला वयाच्या ६० व्या वर्षी दर महा ५ हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल.  दरम्यान जी व्यक्ती आयकर विभाग इनकम टॅक्सच्या कक्षेत येते ती या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही. अटल पेन्शन योजनेविषयी अधिक माहितीसाठी आपण https://npscra.nsdl.co.in/nsdl/scheme-details/APY_Scheme_Details.pdf या संकेतस्थळावर जावे.

English Summary: how get benefit of Atal pension yojana ; know details about scheme benefits
Published on: 02 April 2020, 01:53 IST